जगभरातील EV’s वर लिहिलेले असेल ‘मेड इन इंडिया’,PM मोदींनी गुजरातमधून दाखवलं ‘सोनेरी’ स्वप्न

EVs with ‘Made in India’ tags to be operated in 100 countries: PM Modi : जगातील डझनभर देशांमध्ये धावणाऱ्या ईव्हीवर ‘ मेड इन इंडिया’ असे लिहिलेले असेल असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोडो देशवासियांना मोठं सोनेरी स्वप्न दाखवलं आहे. गणेश उत्सवाच्या उत्साहात भारताच्या ‘ मेक इन इंडिया ‘ प्रवासात एक नवीन अध्याय जोडला जात आहे . ‘ मेक इन इंडिया’ , ‘ मेक फॉर वर्ल्ड ‘ ही देशासाठी त्या ध्येयाकडची एक मोठी झेप असल्याचेही मोदी म्हणाले. मोदींच्या हस्ते आज ( दि.२६) गुजरातमधील टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लांटमध्ये हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
भारतीय बनावटीच्या ईव्ही 100 देशात धावणार
उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, “आजपासून भारतात बनवलेली इलेक्ट्रिक वाहने १०० देशांमध्ये निर्यात केली जातील. यासोबतच आज हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोलाइट उत्पादन देखील सुरू होत आहे. हा दिवस भारत आणि जपानमधील मैत्रीला एक नवीन आयाम असून, मी सर्व देशवासीयांचे, जपानचे आणि सुझुकी कंपनीचे अभिनंदन करतो.
VIDEO | Hansalpur, Gujarat: PM Narendra Modi addresses a gathering after flagging off Maruti Suzuki's 1st electric vehicle e-Vitara.
He says, "On the occasion of Ganesh Utsav, a new chapter is being added to the Make in India yatra. ‘Make in India, Make for the World’ is a big… pic.twitter.com/UNwvEqliJC
— Press Trust of India (@PTI_News) August 26, 2025
मित्र जपानसारखा असावा
आज संपूर्ण जग भारताकडे पाहत असून, अशावेळी कोणतेही राज्य मागे राहू नये. प्रत्येक राज्याने या संधीचा फायदा घ्यावा. भारतात येणारे गुंतवणूकदार इतके गोंधळलेले असले पाहिजेत की, त्यांना वाटेल की या राज्यात जावे की त्या राज्यात जावे. विकासात्मक धोरणांमध्ये स्पर्धा करण्याचे आवाहनही यावेळी मोदींनी देशातील सर्व राज्यांना केले. भारतात लोकशाहीची ताकद आहे.
भारतात लोकशाहीचा फायदा आहे. आपल्याकडे कुशल कामगारांचा मोठा साठा आहे. ही आपल्या प्रत्येक भागीदारासाठी फायदेशीर परिस्थिती असल्याचेही मोदी म्हणाले. आज सुझुकी जपान भारतात उत्पादन करत आहे आणि येथे बनवलेल्या वाहनांची निर्यात जपानला केली जात आहे. हे केवळ भारत-जपान संबंधांच्या बळकटीचे प्रतीक नाही तर, भारतावरील जागतिक विश्वासाचे प्रतिबिंब देखील आहे.