PM मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी मोठी कारवाई, काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा

PM Modi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वोटर अधिकार यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या आईबद्दल मंचावरुन अपशब्द वापरल्याप्रकरणी बिहारच्या सिमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, भाजप जिल्हाध्यक्ष आदित्यनाथ नारायण मन्ना यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मतदार अधिकार यात्रा काढली होती. या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईविरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले असं एफआयआरमध्ये म्हटले आहे. काँग्रेस नेते मोहम्मद नौशाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक जगुनाथ रेड्डी म्हणाले की, नौशाद आणि इतरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सिमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे. असं माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक जगुनाथ रेड्डी म्हणाले.
तर दुसरीकडे सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी कम डीएसपी विपिन बिहारी म्हणाले की, त्यांच्या कार्यालयात एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. दुसरीकडे, पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय समीकरण बदलणार; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत MIM ला साथ देणार ‘हा’ पक्ष
दुसरीकडे, तरडीहच्या पूर्व विभागाचे भाजप अध्यक्ष पुरुषोत्तम झा यांनीही सकतपूर पोलिस ठाण्यात अर्ज देऊन मोहम्मद नौशाद यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.