राजकुमार रावचा ‘SRI The Inspiring Journey of Srikanth Bola’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
SRI The Inspiring Journey of Srikanth Bola: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान कलाकार आहे. तो पडद्यावर गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही भूमिका उत्तमरित्या करत असतो. राजकुमार रावचा शेवटचा चित्रपट ‘द फर्स्ट केस’ हिट होता, या चित्रपटातील अभिनयाचं तर प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. आता राजकुमार राव एका उत्कृष्ट बायोपिकद्वारे मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘उद्योगपती श्रीकांत बोला’ यांचा हा बायोपिक आहे. राजकुमार रावचा आगामी सिनेमा 10 मे 2024 दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
T-Series Films आणि Choc N Cheese Films तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘SRI’ सह श्रीकांत बोलाची यांची हृदयस्पर्शी कथा घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहेत. या सिनेमात राजकुमार राव, अलाया एफ, ज्योतिका आणि शरद केळकर अभिनीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
जगदीप सिद्धू आणि सुमित पुरोहित यांनी लिहिलेले, प्रथम मेहता यांनी चित्रित केलेले, SRI हा श्रीकांत बोला या उद्योगपतीचा बायोपिक आहे. गुलशन कुमार आणि T-Series प्रस्तुत T-Series Films आणि Chack N Cheese Films Production LLP चा SRI चित्रपट तुषार हिरानंदानी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी निर्मित आहेत. हा चित्रपट 10 मे 2024 रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
Singham 3 : हातात बंदूक अन् चेहऱ्यावर… ; करीना कपूरचा ‘सिंघम अगेन’मधील फर्स्ट लूक प्रदर्शित
श्रीकांत बोलाचा बायोपिक
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अशी माहिती समोर आली होती की, राजकुमार रावने टी-सीरीज प्रोडक्शन अंतर्गत बायोपिक साईन केला आहे. तुषार हिरानंदानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात राजकुमार राव प्रसिद्ध उद्योगपती श्रीकांत बोलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रीकांतने सांगितले की, आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनममधील सीतारामपुरम या छोट्याशा गावचा रहिवासी आहे, तो जन्मापासूनच अंध आहे. पण श्रीकांतने ही कमतरता कमकुवत होऊ दिली नाही आणि यशाचा नवा सिनेमा लिहिला. 2017 मध्ये फोर्ब्सच्या ‘अंडर-30 आशिया’ यादीत श्रीकांत यांचे नाव समावेश करण्यात आला आहे.