‘पठाण’ची चौथ्या आठवड्यातही मुसंडी, आतापर्यंत जगभरात 998 कोटींची कमाई
बॉलिवूड किंग शाहरुख खान (Bollywood King Shah Rukh Khan) याचा ‘पठाण’ (Pathan) हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर (box office) छप्परफाड कमाई करत आहे. पठाणने बॉक्स ऑफीसवर 988 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने चौथ्या शनिवारी पठाणने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली. या चित्रपटाने भारतात 3.32 कोटी जमा केले. (हिंदी – 3.25 कोटी, सर्व डब आवृत्त्या – 0.07 कोटी).
तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खानने मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आणि त्याच्या कमबॅकच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दणक्यात कमाई केली. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ने पदार्पणाच्या दिवशीच या चित्रपटाने भारतात 54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर परदेशातही त्याची प्रचंड क्रेझ पहायला मिळाली. आतापर्यंत पठाणने परदेशात $45.35 दशलक्षची नोंद केली आहे, तर भारतात नेट कलेक्शन 511.42 कोटी (हिंदी – 493.60 कोटी, डब केलेले – 17.82 कोटी) असून जगभरातील एकूण 988 कोटी रुपये आहे.
पठाण आता जगभरात 1000 कोटी आणि हिंदी आवृत्तीमध्ये 500 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी सोमवार 20 ते गुरुवार 23 तारखेपर्यंत हा आठवडा पठाण सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पठाणच्या सर्व तिकिटांची किंमत 110 रुपये असणार आहे. ज्यांनी अद्याप पठाण बघितलेला नाही त्यांना स्वस्तात सिनेमा पाहायची ही उत्तम संधी आहे. तर ज्यांना पठाण आवडला ते पुन्हा एकदा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करु शकतात. त्यामुळे आता पठाणच्या कमाईत आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे.
Maharashtra Politics : संजय राऊतांना शहाजीबापू पाटलांचा विषारी टोला…
YRF चे रोहन मल्होत्रा यांनी सांगितले की, 2023 ची सुरुवात केवळ YRF साठीच नाही तर संपूर्ण बॉलीवुडसाठी अभिमानाची गोष्ट आहे. चार आठवडे उलटून गेले तरी पठाण तुफान कमाई करत आहे. पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई पाहता आता सर्व थिएटर चालकांनी तिकिटांचे दर कमी केले आहेत. पठाणने 998 कोटींचा गल्ला जमवल्याच्या आनंदात ही ऑफर देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आता हा चित्रपट वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये 998 कोटींचा टप्पा पार केला आहे. म्हणजेच हा चित्रपट आता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ (969 कोटी) आणि आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ (966 कोटी) या चित्रपटांना मागे टाकले आहे.