Aditya Thackeray : मोठी बातमी ! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी

Aditya Thackeray : मोठी बातमी ! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी

Aditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या (Aditya Thackeray) अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या राजकारणात मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून आदित्य ठाकरे यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही चौकशी सुरू केली गेली तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत(Sushant Singh Rajput) याचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्याआधी दिशा सालियान (Disha Salian) हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी सुशांतसिंह राजपूत त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या सगळ्या प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात होते. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशीचीही मागणी वारंवार केली जात होती. भाजप नेत्यांकडून हे प्रकरण उचलून धरण्यात आले होते.

त्यानंतर आता राज्य सरकारने या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार आहे. चौकशीत काही माहिती समोर येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं होतं ?

दिशा सालियान अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक होती. 8 जून 2020 रोजी मुंबईत घराच्या बाल्कनीतून खाली पडून तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येची नोंद केली होती. पण तिने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर सहा दिवसांनी सुशांतसिंह सुद्धा मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

ठाकरे गटाची उच्च न्यायालयात याचिका 

8 जून 2020 रोजी दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच, 13 आणि 14 जून 2020 रोजीचं सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावं. तसेच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकेरंशी संबंधित सारं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube