Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा!

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा!

Sushant Singh Rajput Case: २०२० मध्ये लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं. १४ जून २०२० मध्ये बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput Case) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि संपूर्ण बॉलिवूड हादरल्याचे पाहायला मिळालं. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाचा तपास करत असताना या प्रकरणाला अनेक वेगवेगळे वळणं बघायला मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)


त्यातून रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) हे नावं पुढे आले होते. हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते आणि एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळाली होती.  त्यांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातून त्यांच्या अफेअर्सची चांगलीच चर्चा रंगत होती. रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज केसमध्ये देखील नावं पुढे आले होते. यामुळे ती अनेक दिवस तुरूंगात होती. त्यानंतर तिला जामीन देखील मिळाला होता. परंतु आता या बाबतीमध्ये रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसवी राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार की, सीबीआय (CBI) तिच्या जामीनला अपील करणार नाही. परंतु या कायद्याचा सवाल हा योग्यवेळी विचारासाठी खुला ठेवण्यात येणार आहे. परंतु सेक्शन २७A नुसार एखाद्याला तुरूंगात पाठवले जाऊ शकणार आहे. या निर्णयाची सुनावणी जस्टिस एएस बोपन्ना आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने यावेळी केली आहे. यावेळी हेही सांगितले आहे की, ते कलमाच्या स्पष्टीकरणानुसार, ते विचारांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. आणि आदेशाला देखील उदाहरण देऊ नये’, असे एएसजी यावेळी म्हणाले आहेत.

Ravindra Mahajani यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…

याअगोदर बॉम्बे हायकोर्टाने (Bombay High Court) रियाच्या जामीनावेळी सांगितले होते की, ड्रग्स खरेदी करून त्याच्यासाठी पैसे दिले याचा अर्थ असा नाही की, ती अवैध तस्करी करत होती. अमली पदार्थांसाठी पैसे देणे म्हणजे याचा हा अर्थ नाही की तिनं कोणाला यासाठी प्रोत्साहन केले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला १ महिन्याचा तुरूंगवास करण्यात आला होता. यामधून अनेक तिच्या चाहत्यांनी आणि तिच्या इंडस्ट्रीतल्या सहकलाकारांनी तिच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यासाठी पांठिंबा देखील दर्शविला होता. रिया चक्रवर्ती ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे.

आपल्या हटके आणि स्टाईलसाठी देखील ओळखली जात असते. सध्या ती रोडिजमधून चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून तिनं अनेक लोकप्रिय सिनेमातून कामं केली आहेत. सोशल मीडियावर देखील तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनं संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला होता. अनेक महिने त्याच्या या प्रकरणाची माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा पिकली होती. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाला ३ वर्षे पुर्ण झाली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube