पोलिसांचे हात बांधलेले, स्वार्थी सरकार…आकाच्या मांडीला मांडी लावून, आदित्य ठाकरे कोणावर बरसले?

पोलिसांचे हात बांधलेले, स्वार्थी सरकार…आकाच्या मांडीला मांडी लावून, आदित्य ठाकरे कोणावर बरसले?

Aditya Thackeray Press Conference : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांची अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session 2025) पार्श्वभूमीवर चर्चा केली गेलीय. अधिवेशनादरम्यान कोणत्या विषयांवर आक्रमक भूमिका घ्यायची यावर रणनीती ठरली आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद देखील पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास दानवे हे नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, मी विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षाला पत्र दिलेलं आहे. आम्ही छोट्या मनाचे नाही आहोत की, बसण्याच्या जागेवरून विवाद करू. आम्ही महिला, कायदा-सुव्यवस्थेचा विषय मांडलेले (Maharashtra Budget) आहे. परंतु सत्ताधारी पक्षात असलेल्या लोकांवर होते, तसं सत्तेत नसलेल्या लोकांवर संकट असल्यावर का होत नाही? तुम्ही वचनपूर्ती करणार आहेत की नाही? लाडक्या बहि‍णींनी निधी वाढवून देणार आहे की नाही? असे सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय.

Budget Session : चहापानावर मविआचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरणार, मविआच्या बैठकीत काय ठरलं?

माज सत्ताधारी पक्षाला आलाय, त्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करोत आहे. कदाचित उद्या त्याचं भांडण विरोधी पक्षनेत्यावरून होतंय. सत्ताधारी पक्षात पालकमंत्रिपद, कोणते बंगले कोणाला? यावर भांडण होतंय. तसं आमचं नाही. आमचं सगळं खुलं असतं. कायदा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. देशाचे नागरिक म्हणून कोणाचीही छेडछाड होणं चुकीचं आहे. कोणावर अपहरण, कोणावर घोटाळ्याचा आरोप होतोय. मुख्यमंत्र्‍यांना स्वच्छ सरकार पाहिजे, मग ही लोकं स्वच्छ आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय.

संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी; मनसेच्या पुस्तक प्रदर्शनातील हजेरी राष्ट्रवादीला खटकली

राज्यात दहा वर्ष फडणवीस साहेबच गृहमंत्री होते. पोलिसांचे हात का बांधलेले आहेत. घाणेरडं राजकारण धक्कादायक वळण घेतंय, केंद्रिय मंत्र्‍यांच्या मुलीला देखील सोडलं जात नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आम्ही जे मांडत आहोत, ते जनता देखील मांडत आहे. कोणतंही सरकार असेल, तर तिथे कोणताही विरोधी पक्षाचा एक नेता असेल. आकाच जर मांडीला मांडी लावून बसत असेल, तर काय मग सरकार. म्हणजे तुमचं स्वार्थी राजकारण सुरू आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची भूमिका असेल, जर कोणी दोषी असेल तर त्याला थेट तुरूंगात पाठवू, असं देखील आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube