Budget Session : चहापानावर मविआचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरणार, मविआच्या बैठकीत काय ठरलं?

Ambadas Danve : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) उद्यापासून सुरु होणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र, या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. बहिष्कार घालण्यामागचे कारणही विरोधी पक्षाने आज पत्रकार परिषद घेऊन विषद केलंय.
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुमाकूळ, देशभरात 434.25 कोटी रुपयांची कमाई
मविआचा चहापानावर बहिष्कार…
आमदार अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांची नुकतीच पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना दानवेंनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सरकारकडून विरोधी पक्षाला कायम सापत्न वागणूक मिळत आहे. सरकारकडून संसदीय लोकशाहीचे पालन केले जात नाही. केवळ चहापानाचा फार्स सरकार करतं. पण इतर वेळी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सरकारच्या कोणत्याही प्रकारे आदर केला जात नाही. सरकारकडून विरोधी पक्षाला सहकार्य मिळत नसल्याने विरोधी पक्ष चहापानावर बहिष्कार घालत आहे, असं दानवे म्हणाले.
संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी; मनसेच्या पुस्तक प्रदर्शनातील हजेरी राष्ट्रवादीला खटकली
पुढं त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली. वाल्मिक कराडला व्हीआयपी वागणूक दिली जात आहे, काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, गडचिरोली जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असूनही दारूबंदीबाबत सात हजार गुन्हे दाखल आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप दानवेंनी केला.
सरकार राज्याच्या विकासासाठी विविध उपाययोजना राबवित असल्याचा केवळ आभास निर्माण करतेय, अशी टीकाही दानवेंनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला २ महिने पूर्ण झाले असून अद्याप आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले. ज्याप्रमाणे वाल्मिक कराड सारख्या सहाईत गुन्हेगारास पोलीस प्रशासनाकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसारखी मिळत असलेली वागणूक पाहता, पोलीस प्रशासन नक्की कोणासाठी काम करते, सामान्य जनतेसाठी की गुन्हेगारांसाठी?, असा सवाल दानवेंनी केला.
पुणे, मुंबई आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये चोरी, दरोडे, खून या घटनांत वाढ झाली. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. आणि मात्र, महिलांसाठी तयार करण्यात आलेला शक्ती कायदा अंमलात आणण्यासाठी सरकारला अपयश झालं आहे, अशी टीका दानवेंनी केली.