VIDEO : मला बिर्याणी अन् चिकन फ्राय हवंय, चिमुकल्याच्या विनंतीवर सरकार करतंय अंगणवाडीतील मेनूमध्ये बदल
Kerala Boy Wants Biryani And Chicken Fry Not Upma : केरळच्या (Kerala) अंगणवाडीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्याने अंगणवाडीत उपम्याऐवजी बिर्याणी अन् चिकन फ्रायची (Biryani And Chicken Fry) मागणी केलीय. या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान (Viral) फिरतोय. हा व्हिडिओ एका शंकू नावाच्या मुलाचा आहे. त्याने विनंती केलीय की, त्याला अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या उपम्यापेक्षा बिर्याणी आणि चिकन फ्राय जास्त आवडते. त्यांच्या या गोड बोलाने अनेकांनी मनं जिंकलीत. पण, केरळ सरकारला देखील विचार करायला भाग पाडलंय.
मोदी सरकारचा मोठा निर्णय, मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी देणार जागा अन् ‘इतके’ रुपये
असं म्हटलं जातंय की, हा व्हायरल व्हिडिओ शंकूच्या आईने रेकॉर्ड केलाय. यामध्ये शंकू अगदी निरागसपणे सांगतोय की, त्याला बिर्याणी आणि चिकन फ्राय हवंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणात लाईक केलंय. या व्हिडिओला जनतेकडून इतके प्रेम मिळालंय की, त्याचे पडसाद सरकारपर्यंत पोहोचलेत. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मुलाच्या या मागणीला पाठिंबा दिलाय. त्याच वेळी, काही लोकांनी सरकारला देखील अंगणवाडी मेनूचा पुनर्विचार करण्याची विनंती केलीय.
View this post on Instagram
केरळच्या आरोग्य, महिला आणि बालविकास मंत्री वीणा जॉर्ज यांनीही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी सांगितलं की, राज्य सरकार मुलांच्या इच्छा लक्षात घेऊन अंगणवाडी मेनूचा आढावा घेईल. मुलांना पौष्टिक आहार देण्यासाठी सरकार आधीच अनेक योजना राबवत आहे. ज्यामध्ये अंडी आणि दूध यांचा समावेश आहे. स्थानिक संस्थांच्या सहकार्याने मुलांच्या आहारात विविधता आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, बालविकास मंत्री वीणा जॉर्ज यांनी शंकू, त्याची आई आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलंय. त्या म्हणाल्या की, आपण शंकूच्या निष्पाप इच्छेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांच्या सूचना लक्षात घेऊन मेनूचा आढावा घेतला जाईल.
PM मोदी अमेरिका दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसोबत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
शंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आतापर्यंत हजारो लोक शंकूच्या निरागसतेने प्रेमात पडलेत. व्हिडिओवर कमेंट्सचा पूर आला. अनेक वापरकर्त्यांनी विनोदाने म्हटलंय की, शंकू हा खरा फूडी आहे, तर काहींनी लिहिलंय की, बिर्याणीप्रेमींना त्यांचा खरा हिरो सापडला आहे. माध्यमांशी बोलताना शंकू म्हणाला की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी आम्हाला फोन करून शंकूला बिर्याणी आणि चिकन फ्राय पाठवलं. तो खूप आनंदी आहे.