PM मोदी अमेरिका दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसोबत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

PM मोदी अमेरिका दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसोबत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

PM Modi America Visit On 12 February Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 12 फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची (America) भेट घेणार आहेत. दरम्यान या भेटीत व्यापार, संरक्षण, इंडो-पॅसिफिक रणनीती यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं समोर आलंय. ट्रम्प प्रशासनाच्या यूएसएआयडी (Donald Trump) बंद करण्याच्या निर्णयाचा भारतावर कमीत कमी परिणाम होणार असल्याचं देखील सांगितलं जातंय. कारण देशाची अर्थव्यवस्था आधीच मजबूत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून कसे सुटले? लाच देऊन की बादशाहला चकवा देत पराक्रम गाजवून?

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात 12 तारखेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर ही दोन्ही नेत्यांमधील पहिलीच समोरासमोर भेट असणार आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी फोनवरून त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले होते. या महत्त्वाच्या बैठकीत भारत-अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.

पंतप्रधान मोदी 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी फ्रान्समध्ये होणाऱ्या एआय अॅक्शन समिटमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते 12 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान व्यापार, संरक्षण सहकार्य, इंडो-पॅसिफिक रणनीती आणि प्रादेशिक सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळतेय.

Video : मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; सुप्रिया सुळेंनी पीक विमा घोटाळा मांडला लोकसभेत

यूएसएआयडी बंद झाल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. भारताच्या मजबूत आर्थिक स्थितीमुळे आणि वाढत्या जागतिक भूमिकेमुळे, या साहाय्य कार्यक्रमाचे बंद होणे, हा देशासाठी मोठा धक्का ठरणार नाही. यूएसएआयडी गेल्या 70 वर्षांपासून भारतात काम करत आहे, गरजू देशांना मदत पुरवते. तथापि, भारताला आधीच खूप कमी आर्थिक मदत मिळत होती.

चालू आर्थिक वर्षात भारताला USAID कडून 140 दशलक्ष डॉलर्सची मदत मिळणार होती, ती भारताच्या 600 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बजेटच्या तुलनेत खूपच कमी आहे. दरम्यान, नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या वेबसाइटवरून आणि इतर सरकारी प्लॅटफॉर्मवरून USAID शी संबंधित सर्व पृष्ठे काढून टाकण्यात आली आहेत. या विकासावरून असं दिसून येतंय की, भारत आता परदेशी मदतीवर अवलंबून नाही. आपल्या आर्थिक बळकटीने जागतिक स्तरावर आपले स्थान अधिक मजबूत करत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube