America Moon Mission : चंद्रावर उतरलं अमेरिकेचं लॅंडर; भारतानंतर दक्षिण ध्रुवावर जाणारा ठरला दुसरा देश

America Moon Mission : चंद्रावर उतरलं अमेरिकेचं लॅंडर; भारतानंतर दक्षिण ध्रुवावर जाणारा ठरला दुसरा देश

America Moon Mission : भारतानंतर आता अमेरिकेचं लॅन्डर ( America Moon Mission) देखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा अमेरिका हा भारतानंतर दुसरा देश ठरला आहे. कमर्शियल अमेरिकी स्पेस क्राफ्ट ओडीसिएस लुनर लँडरने सिग्नल पाठवत आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पोहोचल्याचा संदेश दिला.

Rohit Pawar : ठाकरेंची ‘मशाल’ अन् ‘तुतारी’ घेत लढायचं; रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं

त्यानंतर या मिशनमध्ये काम करत असलेल्या इंटूएटिव्ह मशीन या कंपनीकडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेल्या ओडीसिएस लँडरचा फोटो देखील जाहीर करण्यात आला. या कंपनीचे चेअरमन टीम क्रेन यांनी सांगितले की, आम्हाला ओडीसिएस लॅन्डरकडून मिळालेल्या मेसेजनुसार आम्ही निसंदेहपणे सांगू शकतो की, आमचं लेंडर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं आहे. तसेच त्यांनी यावेळी आयएम टीमला शुभेच्छा देत म्हटलं की, आता आम्ही या लँडरकडून आणखी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत.

Tiger Shroff: टायगर श्रॉफ वुमेन्स प्रीमियर लीगसाठी करणार खास परफॉर्मन्स

दरम्यान या मिशनच्या यशस्वी त्यानंतर अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने सांगितलं की, हे मिशन नासाकडून अर्थसहाय्य देऊन पूर्ण करण्यात आलं. तसेच ते मानव रहित कमर्शियल रोबोटचा एक भाग आहे. याद्वारे भविष्यात चंद्रावर मनुष्याला पाठवण्यासाठी 2026 मधील मिशनसाठी मदत होणार आहे.

दरम्यान या अगोदर ऑगस्ट महिन्यामध्ये भारताचा विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलं होतं. चंद्राचा दक्षिण ध्रुव म्हणजे अत्यंत थंड आणि वातावरणाच्या दृष्टीने कठीण प्रदेश आहे. त्यामुळे भारत या भागामध्ये लँडर उतरवणारा पहिला देश ठरला. तर आता अमेरिकेने देखील आपलं यान दक्षिण ध्रुवावर उतरवून अपोलो मिशननंतर तब्बल 50 वर्षांनंतर चंद्रयान अभियान सुरू केलं आहे. या अगोदर 1972 मध्ये अमेरिकेकडून हा प्रयत्न करण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज