छ. संभाजीनगरच्या वराने वधूच्या गावकऱ्यांचं मन जिकलं; 33 कोटींचा अपघात विमा काढून दिलं रिटर्न गिफ्ट…

नांदेडच्या बहादरपूरामध्ये झालेल्या विवाह सोहळ्याची सर्वत्रच चर्चा होत असून सिद्धेश्वर पेठकर यांच्या कृतीचे गावकऱ्यांनी कुटुंबियांचे आभार मानले.

Sidheshwar Pethekar

Sidheshwar Pethkar Wedding News : आत्तापर्यंत आपण लग्न म्हटलं की, गाजावाजा, आनंद, जल्लोष आणि उत्साह एवढंच पाहिलंय. पण मराठवाड्यातील एका वराने समाजाला एक नवीनच आदर्श घालून दिलायं. वधूच्या कुटुंबियांकडून हुंडा, सोनं-नाणं न घेता याउलट संपूर्ण गावालाच तब्बल 33 कोटी रुपयांचं रिटर्न गिफ्ट दिलंय. सिद्धेश्वर पेठकर (Sidheshwar Pethkar Wedding) असं या नवरदेवाचं नाव असून पेठकर यांनी फक्त आपल्या होणाऱ्या बायकोचीच नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या भविष्याची काळजी घेतलीयं. पेठकर कुटुंबिय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे.

काय सांगता! फक्त सकाळचं कुत्र्याला फिरायला नेतो अन् ‘एवढे’ पैसे कमवतो…महिन्याची कमाई किती असेल?

नांदेडच्या कंधार येथील बहादरपुरा गावात सिद्धेश्वर पेठकर यांचा विवाह 20 मे रोजी पार पडला. या विवाह सोहळ्याला पेठकर कुटुंबियांनी अवाजवी खर्चाला फाटा देऊन सामाजिक भान जपल्याचं दिसून आलं. लग्न म्हटलं की आपण वधू-वरांना आहेर स्वरुपात भेटवस्तू देतो. परंतू या विवाह सोहळ्यात पेठकर कुटुंबाने विवाहासाठी आलेल्या पाहुण्यांनाच रिटर्न गिफ्ट दिलंय. पेठकर कुटुंबियांकडून बहादरपुरा गावातील तब्बल 3 हजार 465 नागरिकांचा प्रत्येकी 1 लाख रुपयांचा अपघात विमा उतरवून गावकऱ्यांना रिटर्न गिफ्टच दिलंय. अर्थाच पेठकर कुटुंबाने गावाला तब्बल 33 कोटी रुपयांचं एक सुरक्षा कवचच दिलं आहे.

प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित, मिळणार विधानपरिषदेची उमेदवारी; ‘या’ दिवशी करणार पक्ष प्रवेश

अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबावर आभाळ कोसळतं म्हणूनच..,
अनेकदा ग्रामीण भागातून वेगवेगळ्या घटनांमुळे मृत्यू होण्याच्या घटना घडत असतात. साप चावणे, अंगावर वीज पडणे, या घटना घडत असतात. अशा अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास गरीब कुटुंबावर आभाळ कोसळतं, असं होऊ नये या भावनेतून आम्ही गावकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा निर्णय घेतल्याचं अनुप पेठकर यांनी सांगितलंय.

शेतकरी संकटात असताना मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदे यांची पंतप्रधानांवर टीका

या विवाह सोहळ्याला तब्बल 4500 पाहुणे उपस्थित होते. गावातील नागरिक मोहन शेकापुरे आणि सरपंच बळीराम पेठकर यांच्यासह संपूर्ण गावाने या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केलीयं. पेठकर कुटुंबाने केलेला हा खर्च संपूर्ण गावाला जगण्यासाठी अधिकच बळ देऊन गेला आहे. पेठकर कुटुंबाने जे केलं खरंच त्यालाच म्हणतात श्रीमंती. या कृतीमुळे खरोखर पेठकर कुटुंबियांची श्रीमंती पैशांनी नाही तर विचारांनी मोजलीयं.

follow us