मी सदस्य नाही, पण सन्माननीय कॉकरोच आहे’; CJP आंदोलनाला सोनम वांगचुकांचा जाहीर पाठिंबा, सरकारला दिला महत्त्वाचा सल्ला

मी ना बेरोजगार आहे, ना आळशी आहे. त्यामुळे या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही. पण मी स्वतःला सन्माननीय कॉकरोच मानतो, असे ते म्हणाले.

  • Written By: Published:
Untitled Design 83 1

Sonam Wangchuk’s public support for the CJP movement : पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टी या ऑनलाईन आंदोलनाला पाठिंबा दर्शवत स्वतःला सन्माननीय कॉकरोच असे संबोधले आहे. तरुणांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला दडपण्याऐवजी सरकारने त्यांच्या भावना आणि संदेश समजून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

बेरोजगारी, प्रश्नपत्रिका गळती, सार्वजनिक उत्तरदायित्व आणि शासनव्यवस्थेत त्रुटींवर व्यबगात्मक पद्धतीने भाष्य करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी या डिजिटल मोहिमेला सध्या सोशल मीडियावर मोठा प्रतिइस्ड मिळताना दिसत आहे. मात्र, या आंदोलनाशी संबंधित काही सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात येत असल्याचा आणि आणि हॅकिंगचे प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील आंदोलनाच्या संस्थापकांकडून करण्यात आला आहे.

या आंदोलनात औपचारिकरीत्या सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता सोनम वांगचुक यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले. मी ना बेरोजगार आहे, ना आळशी आहे. त्यामुळे या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही. पण मी स्वतःला सन्माननीय कॉकरोच मानतो, असे ते म्हणाले. तरुणांच्या या मोहिमेचे समर्थन करताना वांगचुक यांनी सांगितले की, लोकशाहीत व्यंग आणि प्रतीकात्मक अभिव्यक्तीला महत्त्वाचे स्थान असते. संदेशवाहकाला संपवून संदेश संपत नाही. सरकारने या आंदोलनामागील भावना समजून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

इराण-अमेरिका अणुकरार अंतिम टप्प्यात? उच्च संवर्धित युरेनियमचा साठा सोडण्यास तेहरानची तत्त्वतः तयारी

त्यांनी व्यंगचित्रकारांचे उदाहरण देत सांगितले की, देशातील पंतप्रधान, गृहमंत्री किंवा अन्य नेत्यांवर व्यंगचित्रे प्रसिद्ध होतात, मात्र त्यामुळे व्यंगचित्रकारांवर कारवाई होत नाही. त्याचप्रमाणे कॉकरोच हे प्रतीक वापरून तरुणांनी आपली नाराजी व्यक्त केली, तर त्याकडे लोकशाहीतील वैध अभिव्यक्ती म्हणून पहिले गेले पाहिजे, असे देखील त्यांनी नमूद केले.

या आंदोलनाच्या अहिंसक आणि सर्जनशील स्वरूपाचे कौतुक करताना वांगचुक म्हणाले की, इतर काही देशांप्रमाणे हिंसक आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी भारतातील तरुणांनी डिजिटल आणि क्रीएटीव्ह माध्यमातून आपला आवाज उठवला आहे. हे नव्या पिढीच्या लोकशाहीवादी विचारांचे प्रतीक आहे. सोशल मीडिया अकाउंट्स बंद केल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी इशारा दिला की, तरुणांच्या अभिव्यक्तीची दारे बंद केल्यास त्यातून अधिक तीव्र असंतोष निर्माण होऊ शकतो. नेपाळमधील राजकीय अस्थिरतेचा संदर्भ देत त्यांनी सरकारने संवाद आणि सहनशीलतेचा मार्ग स्वीकारावा, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, वांगचुक यांनी तरुणांना शंततापूर्ण मार्गानेच आपला आवाज उठवत राहण्याचे आवाहन केले. नाराजी किती देखील असली तरी हिंसेचा मार्ग स्वीकारू नका. मात्र सरकारने देखील तरुणांना त्या दिशेने ढकलू नये, असे ते म्हणाले.

follow us