प्रसूतीनंतर पाठ दुखतेय? दुर्लक्ष करणे ठरू शकते जीवघेणे; तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

back pain after childbirth यावर योग्य वेळी उपचार न झाल्यास पुढे मणक्याशी संबंधित गंभीर विकार उद्भवू शकतात

Back Pain After Childbirth

Experiencing back pain after childbirth Ignoring it could prove fatal experts warn of serious condition : प्रसूती म्हणजे बाळाचा जन्म आणि त्यानंतरचा काळ महिलांच्या आयुष्यात असंख्य शारीरिक मानसिक बदलांचा असतो. त्यात अनेक समस्यांना सामोरं जात महिला अनेक आव्हानं पेलत असतात. मात्र यात शरीराकडे केलं जाणारं दुर्लक्ष अनेक गंभर आजारांना निमंत्रण देणारं ठरू शकतं. अशीच एक समस्या म्हणजे प्रसूती नंतरची पाठदुखी याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार होऊ शकतात असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नेमका काय आहे हा इशारा? त्यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या सविस्तर…

क्रिकेटच्या मैदानावर सैफ अली खानचा जलवा; धर्मादाय सामन्यातून दिला मानवतेचा संदेश

प्रसूतीनंतर अनेक महिलांना पाठदुखीचा त्रास जाणवतो. सुरुवातीला ही वेदना सामान्य समजून दुर्लक्षित केली जाते, मात्र योग्य वेळी उपचार न झाल्यास पुढे मणक्याशी संबंधित गंभीर विकार उद्भवू शकतात, कारण गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल घडतात. गर्भाच्या वाढीसोबत वजन वाढते, शरीराचा तोल बदलतो आणि पोटाचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे कंबर आणि मणक्यावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. याशिवाय ‘रिलॅक्सिन’ हा हार्मोन सांधे आणि लिगामेंट्स सैल करत असल्याने प्रसूतीस मदत होते, पण त्याचवेळी मणक्याची स्थिरता कमी होऊन वेदना वाढू शकतात.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत पैसे जमा होणार

प्रसूतीनंतर बाळाला वारंवार उचलणे, स्तनपान करताना चुकीच्या स्थितीत बसणे, पुरेशी विश्रांती न मिळणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे पाठदुखी अधिक तीव्र होऊ शकते. काही महिलांमध्ये स्नायू आखडणे, सतत कंबरदुखी, वाकताना त्रास होणे किंवा जास्त वेळ बसल्यानंतर किंवा उभे राहिल्यानंतर वेदना वाढणे अशी लक्षणे दिसून येतात.

‘एक सरप्राईज आहे…’ म्हणत मानसीने वाढवली उत्सुकता! ‘स्वप्नसुंदरी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

प्रसूतीनंतर सुमारे 70 टक्के महिलांना काही ना काही प्रमाणात पाठदुखीचा अनुभव येतो. विशेषतः 25 ते 37 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये ही समस्या अधिक आढळते. या वेदनांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यास स्लिप डिस्क, मज्जातंतूंवरील दाब किंवा इतर दीर्घकालीन मणक्याचे विकार होण्याची शक्यता वाढते. परिणामी महिलांच्या दैनंदिन कामांबरोबरच बाळाची काळजी घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.

‘धमाल 4’मधून संजीदा शेखला मिळाला मोठा धडा; म्हणाली, “स्वतःवर हसायला शिका!”

प्रसूतीनंतर होणारी पाठदुखी ही अनेक कारणांनी उद्भवते. हार्मोन्समधील बदल, पोटाच्या स्नायूंची ताकद कमी होणे आणि गर्भधारणा व प्रसूतीमुळे शरीरावर आलेला ताण ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. बाळाला उचलताना किंवा स्तनपान करताना योग्य शरीरस्थिती न राखल्यास वेदना अधिक वाढू शकतात. अपुरी झोप आणि विश्रांतीचा अभावही या समस्येला कारणीभूत ठरतो.

ब्रेकिंग : मोशीत कचरा डेपोजवळील इमारत कोसळली; 15 कर्मचारी अडकल्याची भीती

तज्ज्ञांच्या मते, योग्य व्यायाम, संतुलित आहार, शरीराची योग्य ठेवण, वजन नियंत्रणात ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपी किंवा उपचार घेतल्यास बहुतेक महिलांना या त्रासातून पूर्णपणे आराम मिळू शकतो. त्यामुळे प्रसूतीनंतर पाठदुखीला किरकोळ समजून दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

follow us