मोठी बातमी! पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळली, 14 लोक अडकल्याचा अंदाज, आयुक्त विजय सुर्यवंशी काय म्हणाले?
घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Rain) अशातच आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
येथील मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 14-15 लोक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळतात प्रशासनाने मदतकार्य सुरू केले असून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या आतमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मधू दंडवतेंचं उदाहरण देत मिसिंग लिंकवरून टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोशी या ठिकाणी कचरा डेपो भागात इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक होते त्यामधील पाच लोक वाचवले आहेत आणखी 15 लोक अडकलेले आहेत. अडकलेल्या लोकांसोबत एनडीआरएफ जवानांचा संपर्क होत आहे. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरासाठी पुढील २४ ते ४८ तासांकरिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात अत्यंत मुसळधार तर शहरी भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि जुनाट इमारती, झाडे तसेच वीज वाहक तारांपासून दूर राहावे, अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.