ब्राझील मॉडेल स्विकारलं पण ‘त्या’ गोष्टींचं काय? इथेनॉलबाबत भारताच नेमंक चुकतयं काय?
Indias ethanol Petrol and Brazilian model सरकारकडून इथेनॉलच्या ब्राझील मॉडेलचं उदाहरण दिलं जात आहे. मात्र हे मॉडेल नेमंक काय?
Ethanols Brazilian model adopted but Where exactly is India going wrong regarding ethanol Blended Petrol : सध्या युद्ध त्यामुळे महाग झालेलं इंधन आणि त्यात मिश्रित केलं गेलेलं इथेनॉल हा विषय मोठा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरत आहे. कारण यामुळे एकीकडे सर्वसामान्यांच्या गाड्याचं मायलेज कमी होतयं दुसरीकडे पेट्रोलच्या किंमतीही कमी होत नाहीयेत. नुकत्याच सरकारच्याच एका अहवालात गाड्याचं मायलेज कमी होत असल्याचं मान्य ही करण्यात आलं आहे. मात्र त्यावर उपाय काय हे अद्यापही समोर आलेलं नाही. यावर बोलताना सरकारकडून वारंवार इथेनॉलच्या ब्राझील मॉडेलचं उदाहरण दिलं जात आहे. मात्र हे मॉडेल नेमंक काय? ब्राझीलने हे कसं साध्य केलं आणि इथेनॉलबाबत भारताच नेमंक चुकतयं काय? जाणून घेऊ सविस्तर…
मोठी बातमी! डॉक्टरांना मारहाण प्रकरण भोवलं; शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक
ब्राझीलमध्ये 1931 पासून पेट्रोलमध्ये एथेनॉल मिसळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, 1973 मधील जागतिक तेल संकटानंतर देशाने इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 1975 मध्ये ‘प्रो-अल्कोहोल’ हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला. सरकारने साखर कारखान्यांना एथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देत अनुदान, स्वस्त कर्ज आणि खरेदीची हमी दिली.
1979 मध्ये जगातील पहिली 100 टक्के एथेनॉलवर चालणारी Fiat 147 कार बाजारात आली. पुढील काही वर्षांत ब्राझीलमध्ये E20 मिश्रण सर्वसामान्य झाले. मात्र, 1980 च्या दशकाच्या अखेरीस कच्चे तेल स्वस्त झाल्याने आणि साखरेचे दर वाढल्याने एथेनॉल उत्पादन घटले. परिणामी हा कार्यक्रम काही काळासाठी अडचणीत आला.
प्रसूतीनंतर पाठ दुखतेय? दुर्लक्ष करणे ठरू शकते जीवघेणे; तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा
2003 मध्ये फ्लेक्स-फ्यूल तंत्रज्ञानामुळे एथेनॉल क्रांतीला नवे बळ मिळाले. या वाहनांमध्ये पेट्रोल, E100 किंवा दोन्हींचे कोणत्याही प्रमाणातील मिश्रण वापरता येते. आज ब्राझीलमध्ये विकल्या जाणाऱ्या 80 टक्क्यांहून अधिक नव्या गाड्या फ्लेक्स-फ्यूल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. सध्या तेथे सामान्य पेट्रोलमध्ये 27 टक्के एथेनॉल (E27) मिश्रण अनिवार्य असून, इंधन स्वावलंबनाच्या दिशेने ब्राझीलचा हा प्रवास जगासाठी आदर्श मानला जातो. ब्राझीलमध्ये 100 टक्के एथेनॉल (E100) वापरण्याचा टप्पा एका दिवसात गाठलेला नाही. त्यामागे तब्बल पाच दशकांचे नियोजन, तांत्रिक सुधारणा आणि ऊस शेतीवर आधारित धोरणांचा मोठा वाटा आहे.
इथेनॉलबाबत भारताच नेमंक चुकतयं काय?
जर बारकाईने पाहिलं तर भारताने इथेनॉलच्या ब्राझील मॉडेलमधून केवळ पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करणे एवढचं सुत्र उचलेलं दिसत आहे. कारण ते पहिल्याच टप्प्यात सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका देणारं ठरत आहे. दुसरीकडे ब्राझीलच्या धोरणाकडे पाहिलं तर या देशात E100 आणि E27 चं मॉडेल यशस्वी ठरण्यामागे काही महत्त्वाची पाऊलं आहेत. ज्यामध्ये ब्राझील हा देश प्रचंड मोठ्या प्रमाणात उस उत्पादन करणारा देशा आहे. ज्यातून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती करणे शक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या देशात सरकार बदलल तरी देखील इथेनॉलबाबतच धोरण बदललं नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे सरकारने हे धोरण फक्त कागदावर आणल नाही, तर त्यासाठी पुर्ण सिस्टीम आणि इन्फ्रास्ट्रक्चर बदललं त्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला. याची सुरूवात थेट कार कंपन्यांना इथेनॉलला कम्पॅटिबल अशा इंजिनच्या गाड्या बनवण्यापासून झाली. इथेनॉलचं पेट्रोलमधील प्रमाण हळूहळू वाढवण्यात आलं. जेणेकरून लोकांना त्यांच्या गाड्या बदलण्यासाठी वेळ मिळेल. त्याचबरोबर पेट्रोल आणि इथेनॉलच्या किंमतीत फरक होता. लोकांना कोणतं इंधन गाडीत भरायचं आहे याचा पर्याय दिला गेला.
क्रिकेटच्या मैदानावर सैफ अली खानचा जलवा; धर्मादाय सामन्यातून दिला मानवतेचा संदेश
दुसरीकडे जगातील इतर देशांचा विचार केला तर, एथेनॉलचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश असूनही अमेरिका 10 टक्के एथेनॉल मिश्रित पेट्रोल (E10) वापरतो. ते टप्प्याटप्प्याने 15 टक्के एथेनॉल मिश्रणाकडे वाटचाल करत आहे. युरोप आणि ब्रिटनमध्येही जुन्या वाहनांचा विचार करून 10 टक्के (E10) तसेच 5 टक्के (E5) एथेनॉल मिश्रित पेट्रोलचे पर्याय आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत पैसे जमा होणार
भारतात मात्र तसं नाहीये. भारतात एथेनॉल मिश्रण कार्यक्रमाची सुरुवात 2003 मध्ये झाली. मात्र, 2014 नंतर या उपक्रमाला अधिक गती मिळाली आणि देशाने 2025 मध्येच म्हणजे 10 च वर्षांत भारताने 20 टक्के एथेनॉल मिश्रण (E20) करण्याचे उद्दिष्ट नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण केले. मात्र त्याचे परिणाम आणि त्यांना सामोरं जाण्याची सिस्टिम मात्र बनवलीच गेली नाही. कारण E20 ला कम्पॅटिबल अशा इंजिनच्या गाड्या आत्ता 2024-25 पासून आल्या मात्र कोट्यवधी गाड्या ज्या त्या अगोदरच्या आहेत त्यांचं काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
‘एक सरप्राईज आहे…’ म्हणत मानसीने वाढवली उत्सुकता! ‘स्वप्नसुंदरी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
ब्राझीलच्या गेल्या 50 वर्षांच्या अनुभवातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. इंधनातील असा मोठा बदल केवळ सरकारी निर्णयांवर यशस्वी होत नाही. त्यासाठी दीर्घकालीन नियोजन, सक्षम तांत्रिक पायाभूत सुविधा, वाहनांच्या इंजिनशी सुसंगत तंत्रज्ञान, समाधानकारक मायलेज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांचा विश्वास आवश्यक असतो.