Tiger Shroff: टायगर श्रॉफ वुमेन्स प्रीमियर लीगसाठी करणार खास परफॉर्मन्स

Tiger Shroff: टायगर श्रॉफ वुमेन्स प्रीमियर लीगसाठी करणार खास परफॉर्मन्स

Tiger Shroff Special Performance: बॉलीवूडचा (Bollywood) तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) महिला प्रीमियर लीग (WPL) च्या भव्य उद्घाटनाच्या वेळी एक खास परफॉर्मन्स करणार (Special Performance) आहे. 23 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ( M Chinnaswamy Stadium) होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमात टायगर आपल्या हटके डान्स मूव्हसह ‘टायगर इफेक्ट’ दाखवण्यासाठी सज्ज होत आहे.

टायगर हा कायम त्याचा ऍक्शनसाठी ओळखला तर जातोच पण सोबतीने तो उत्तम डान्सर (dancer) सुद्धा आहे. हटके डान्स मूव्हसह तो आता या खास कार्यक्रमात आपला अनोखा परफॉर्मन्स देणार असल्याचं कळतंय. करिष्माई व्यक्तिमत्त्वाने टायगर महिला प्रीमियर लीगच्या पदार्पणात नक्कीच उत्साह घेऊन येणार यात शंका नाही.

पीएम मोदींनी यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’चे केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘लोकांना योग्य… ‘

टायगरच्या सोबतीने सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि शाहिद कपूर यांसारख्या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार देखील परफॉर्मन्स करणार आहेत. बहुप्रतिक्षित कार्यक्रमात शाहरुख खान (Shah Rukh Khan) होस्टिंग आणि परफॉर्म करताना देखील प्रेक्षकांना दिसणार आहे.

वर्क फ्रंटवर टायगर त्याच्या आगामी ईदच्या रिलीजसाठी तयारी करत असू शकते “बडे मियाँ छोटे मियाँ” साठी (Bade Miyan Chhote Miyan) आता तो सध्या चर्चेत आहे. सिंघम अगेन आणि रॅम्बोमध्येही टाइगर दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज