गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र ?
Abhijeet Sawant कायम नवनवीन प्रोजेक्ट्स करताना दिसतोय. आता तो गौतमी पाटीलसोबत नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
 
          Singer Abhijeet Sawant and dancer Gautami Patil together for a new Project : बिग बॉस, इंडियन आयडॉल ते अगदी संगीत विश्वात सगळ्यांची मन जिंकळणारा गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा चर्चेत आला तो म्हणजे अभिजीत सावंत कायम नवनवीन प्रोजेक्ट्स करताना दिसतोय. संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण करत असताना अभिजीत ने आजवर अनेक सदाबहार गाण्याने प्रेक्षकांना मोहित देखील केलं. त्यानंतर आता तो नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
प्रत्येकाला थिरकायला लावणारं “लास्ट स्टॉप खांदा” चं टायटल साँग लाँच! ‘या’ दिवशी येणार चित्रपट
नुकताच नृत्यांगना गौतमी पाटील हिने सोशल मीडिया वर गायक अभिजीत सावंत फोटो शेयर करून त्याला ” New ” अस कॅप्शन दिलं आहे आता हे दोघं सोबत काहीतरी काम करतात का? नवीन प्रोजेक्ट करणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येणाऱ्या काळात ही जोडी सोबत काम करणार का ? हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे !
ब्रेकिंग : जैन बोर्डिंगच्या वादाचा अंक संपला; ट्रस्ट आणि गोखले बिल्डरमधील व्यवहार अखेर रद्द
दरम्यान नवरात्रीमध्ये आलेलं अभिजीतचं प्रेमरंग सनेडो हे प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. प्रेम रंग सनेडो हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून मराठी सोबत गुजराती प्रेक्षकांनी त्याला प्रेम दिलं आहे. अभिजीत सावंत ने आजवर अनेक दर्जेदार गाणी गायली आहे आणि त्याचा गाण्याची जादू ही कायम बघायला मिळते. 20 वर्ष संगीत विश्वात वैविध्यपूर्ण शैलीने त्याने गाण्याचा हा प्रवास असाच सुरू ठेवला आहे. प्रेमरंग सनेडो हे गाणं गुजराती आणि मराठी गाण्याचं मिक्सटेप असलं तरी त्याचा फॅन्सने या गाण्यावर अगणित रील्स देखील सोशल मीडिया वर शेयर केल्या.


 
                            





 
		


 
                         
                        