Big Boss Marathi : गिरीजा, गौतमी ते सदावर्ते; ‘बिग बॉस मराठी’मध्ये कोण-कोण झळकणार?
बिग बॉस मराठी 6 साठी अभिनेत्री गिरीजा ओक, प्रसिद्ध नृंत्यागणा गौतमी पाटील अशा अनेक कलाकारांची नावे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
Big Boss Marathi : बिग बॉस मराठी 6 साठी अभिनेत्री गिरीजा ओक, प्रसिद्ध नृंत्यागणा गौतमी पाटील अशा अनेक कलाकारांची नावे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. रसिका सुनिल, ईशा केसकर, जयवंत वाडकर यांच्याही नावाची चांगलीच चर्चा सुरु आहे.
गिरीजा ओक (Girija Oak) : निळ्या साडीतला गिरीजा ओकचा एक पॉडकास्ट व्हायरल झाला आणि ती रातोरात नॅशनल क्रश झाली. त्यामुळे गिरीजा ओक ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक वेगळी छाप पाडू शकते. गिरीजा ओक मराठी-हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक जाहिरातींतदेखील तिने काम केलं आहे.
गौतमी पाटील (Gautami Patil) : सबसे कातील गौतमी पाटील ‘बिग बॉस मराठी’च्या खेळात सामील होऊ शकते. गौतमीच्या एन्ट्रीने ‘बिग बॉस मराठी’चा टीआरपी प्रचंड वाढू शकतो.
रसिका सुनील (Rasika Sunil) : ‘बिग बॉस मराठी’च्या प्रत्येक सीझनदरम्यान ज्या संभाव्या स्पर्धकांची नावे समोर येतात त्यात अभिनेत्री रसिका सुनीलचं नाव असतंच असतं. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनायाच्या माध्यमातून रसिका सुनील घराघरांत पोहोचली होती. यंदाही रसिका सुनीलला ‘बिग बॉस मराठी 6’साठी विचारणा झाल्याचं समोर आलं आहे.
ईशा केसकर (Isha Keskar) : ‘जय मल्हार’ या मालिकेतील बानू च्या माध्यमातून ईशा केसकर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी झाली. ईशाचा ड्रामा, अभिनय ‘बिग बॉस’च्या घरात एक वेगळी रंगत आणू शकतो.
जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) : ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. जयवंत वाडकर यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची गंभीर आणि रफटफ शैली आणि त्यांचं परिणामकारक व्यक्तिमत्तव स्क्रीनवर सहज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेऊ शकतं. सीनीअर कलाकार असल्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक बॅलेन्स गेम पाहायला मिळू शकतो.
विजय पाटकर (Vijay Patkar) : ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेले अभिनेते विजय पाटकर यांनी आजवर अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. आपला हजरजबाबीपणा आणि साधेपणाने ते ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक फ्रेश वातावरण निर्माण करू शकतील.
समीर परांजपे (Sameer Paranjape) : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता समीर परांजपेने आजवर गंभीर, भावनिक भूमिका साकारल्या आहेत. समीर परांजपे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेला तर कुठेतरी एक अॅग्रेशन पाहायला मिळेल. किंवा त्याच्या स्वभावाप्रमाणे तो एका कोपऱ्यात बसलेलाही पाहायला मिळू शकतो.
गौरव मोरे (Gaurav More) : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला विनोदवीर गौरव मोरे कदाचित ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बघायला मिळू शकतो. कारण गेल्या काही दिवसांत त्याने अनेक प्रोजेक्टमधून माघार घेतली आहे.
अंशुमन विचारे (Anshuman Vichare) : अभिनेता अंशुमन विचारेची ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये एन्ट्री होऊ शकते. पडद्यावर कॉमेडी आणि रिअल आयुष्यात गंभीर असा अंशुमनचा स्वभाव आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तो विनोद करताना दिसेल की गंभीर दिसेल हे पाहावे लागेल.
रोहित राऊत (Rohit Raut) : रोहित राऊत लहान असल्यापासूनच महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला आहे. रोहित आता बिग बॉस मराठी’च्या घरात सहभागी होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॅनी पंडित (Danny Pandit) : ‘झट पट पटापट’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचलेला सोशल मिडिया स्टार डॅनी पंडित ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात सहभागी होऊ शकतो. सध्याच्या घडीला ग्राऊंड लेव्हलवर त्याचा फॅन बेस प्रचंड आहे. बेधडक स्पभाव, रोखठोक पर्सनॅलिटी आणि स्ट्राँग प्रेझेंस बिग बॉसच्या घरात जाऊन प्रेक्षकांचं चांगलच एंटरटेनिंग करू शकतो.
अनुश्री माने (Anushree Mane) : रिलस्टार अनुश्री मानेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं. अनुश्रीच्या अफलातून कमेंट्स प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात ती कसा गेम खेळेल हे पाहावे लागेल.
अर्थव रुके (Atharva Ruke) : सोशल मीडियावर आपल्या रिलने लोकांचं एंटरटेन करणारा रिल- स्टार अर्थव रुके ‘बिग बॉस मराठी’चं सहावं पर्व गाजवताना दिसू शकतो.
गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) : ‘बिग बॉस हिंदी’ गाजवणारे गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातही सहभागी होऊ शकतात. राजकारणासह आपल्या विचित्र शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांची मराठी सीझनमधील एन्ट्री नाकारता येत नाही.
नागेश मडके (Nagesh Madke) : क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर हॉटेल भाग्यश्री. भाग्यश्रीचे सर्वेसर्वा नागेश मडके ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बघायला मिळू शकतात.
रवी काळे (Ravi Kale) : खोटं बोलायचं न्हाय, कॉपी करायची न्हाय अर्थात जलपरीचे सर्वेसर्वासुद्धा आपल्याला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बघायला मिळू शकतात.
लक्ष्मण भोसले (Laxman Bhosale) : हॉटेल तिरंगाचे मालक. ग्राहकांना परवडणारं आणि चविष्ट अन्न देणारं हॉटेल तिरंगाचे संचालक अर्थात लक्ष्मण भोसले ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहभागी होऊ शकतात.
