हत्याकांड…खून…नगर जिल्ह्यात चाललंय काय? 48 तासांत 3 हत्येच्या घटना
Three Murders in 48 hours in Ahilyanagar : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेदिवस ढासळू लागली आहे. 48 तासांत तीन हत्येच्या घटना झाल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिर परिसरातच त्यांचं शीर आणि जवळच्या विहिरीत धड आढळून आलं (Crime News) आहे.
ही घटना ताजी असताना देशासह परदेशात ख्याती असलेल्या साईंच्या शिर्डीमध्ये रस्त्यावर रक्तरंजित खेळ मांडल्याच समोर आलंय. शिर्डी याठिकाणी सोमवारी पहाटे शिर्डी संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन्ही कर्मचारी पहाटे ड्युटीवर जात असताना त्यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला, या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामुळे नगर जिल्ह्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
सूनबाई लय भारी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाचं पोस्टर लाँच
जिल्ह्यात 48 तासांमध्ये तीन निर्घृण हत्या
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथे पहिलवान बाबा मंदिरामध्ये सेवा करत असलेल्या नामदेव रामा दहातोंडे ( वय 68 वर्ष ) नामक व्यक्तीची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. गेल्या 15 वर्षांपासून दहातोंडे हे पहिलवान बाबा मंदिरामध्ये सेवेकरी म्हणून कामकाज (Ahilyanagar Crime) पाहत होते.
मात्र, हे 26 जानेवारी रोजी ते मंदिरात आढळून आले नाही. मंदिरात पुजारी म्हणून काम करणारे एकनाथ घोरपडे हे मंदिरात आले, त्यावेळी त्यांना हे समजल्याने त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ते मिळून आले नाहीत. घोरतळे यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली अन् तपास सुरु झाला. दरम्यान मंदिराच्या शेजारच्या परिसरात मारेकऱ्यांनी एका विहिरीमध्ये त्यांचे शिर, तर दुसऱ्या विहिरीमध्ये धड फेकून दिल्याचे आढळून आले. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
साईंच्या नगरीत भररस्त्यावर घडले हत्याकांड
सोमवारी (3 फेब्रुवारी) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शिर्डीत साई बाबा संस्थेचे दोन कर्मचारी आणि एक तरुण कामानिमित्ताने जाण्यासाठी घराबाहेर पडले, मात्र ते घरी परतलेच नाही. कारण नशेखोर अशा हल्लेखोरांनी तिघांवरही हल्ला केला. शिर्डीच्या तीन वेगवेगळ्या रस्त्यांवर या हल्लेखोरानी तिघांवर प्राणघातक हल्ला चढवला. थेट चाकूने वार करण्यात आला, या हल्ल्यात साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यातील कायदा – सुव्यवस्था ढासळली
नगर जिल्ह्यात अवैध धंदे हे दिवसेदिवस वाढू लागले आहे. पोलिसांकडून अपेक्षित अशी कारवाई होत नसल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळेच खून दरोडे, हत्याकांड अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. किरकोळ कारवाया करत आपणच सिंघम आहोत, असे चित्र जरी पोलीस प्रशासनाकडून दाखवण्यात येत असले, तरी मात्र या पलीकडे जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. गुन्हेगारांवरील खाकीचा धाक कमी होत असल्याने या घटना दिवसाढवळ्या होत आहे. यामुळे पोलिसांनी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे, अशी जनभावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.