Crime News: मुंबईत 5.77 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट जप्त, आरोपीला अटक
Cigarettes Smuggling: डीआरआय मुंबईला (DRI Mumbai) विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, समुद्रमार्गे न्हावा शेवा बंदरात सिगारेटची तस्करी करणाऱ्या कंटेनरची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार डीआरआयने संशयित कंटेनर ओळखला. (Mumbai Crime) या कंटेनरमधून सुमारे ५.७७ कोटी रुपयांचे बंदी घालण्यात आलेले विदेशी सिगारेट जप्त केले आहेत. सिगारेट तस्करीप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सूत्रांकडून डीआरआयला मिळालेल्या माहितीनुसार, सिगारेटच्या काड्या मोठ्या चतुराईने चिंच असलेल्या पुठ्ठ्याच्या पेट्यांत ठेवण्यात आल्या होत्या. फ्रेट स्टेशन (CFS) वर झोनमध्ये उतरवला जाणार होता. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्या कंटेनरच्या हालचालीवर विशेष नजर ठेवली होती. बंदरातून बाहेर पडल्यानंतर तो कंटेनर ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याऐवजी खासगी गोदामात नेला जात असल्याचे आढळले.
कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना संशयास्पद हालचाली जाणवल्याने त्यांनी कंटेनर गोदामात अडवला. तपासणीत, डीआरआयच्या पथकाने जप्त केलेल्या तस्करीच्या सिगारेटची बाजारभालवाप्रमाणे अंदाजे किंमत ५.७७ कोटी रुपये आहे. तर, तब्बल ३३,९२,००० सिगारेटच्या काड्यांचा यात समावेश आहे. अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिगारेटच्या आयातीवर भारतात बंदी आहे.
Thane News : ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब? पोलिसांना मिळाला मेल; बॉम्बस्कॉड घटनास्थळी
सीमाशुल्क अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी ही सिगारेट कंटेनरमधून बाहेर काढत त्यात कागदपत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या वस्तू भरण्यात येणार होत्या. तपासणीत गोदामात कागपत्रांमध्ये घोषित केलेला माल याअगोदरच भरून ठेवण्यात आला होता.