PM Modi यांना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ पुरस्कार प्रदान
PM Narendra Modi Kuwaits Visit Honoured : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर आहेत. आज 22 डिसेंबर रोजी कुवेत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ने सन्मानित करण्यात आलंय. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर-अल-सबाह यांनी मोदींचा गौरव केला. पीएम मोदींना कुवेतच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने (Modi News) सन्मानित केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आलं. पंतप्रधान मोदींचे ‘बायन पॅलेस’ (कुवेतच्या अमीराचा मुख्य राजवाडा) येथे औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. कुवेतचे पंतप्रधान, महामहिम शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांनी मोदींचं स्वागत ( Narendra Modi Kuwaits Visit) केलं.
पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच ! रायगड, बीडसह आणखी तीन जिल्हे डोकेदुखी ठरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर-अल-सबाह यांच्याशी विस्तृत चर्चा केली. ज्यामध्ये भारत-कुवेत संबंधांना विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात नवीन चालना देण्यावर भर देण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या कुवेत दौऱ्यामुळे मैत्रीचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी 21 डिसेंबरपासून दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर-अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून ते कुवेतला पोहोचलेत. गेल्या 43 वर्षात भारतीय पंतप्रधानांची या आखाती देशाला झालेली ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी 1981 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुवेतला भेट दिली होती.
बबन शिंदेंनी अभिनंदन केलं नाही मीच त्यांना भेटायला जाणार; अभिजित पाटलांनी क्लिअर सांगितलं
मैत्रीचे प्रतीक म्हणून हा सन्मान राष्ट्रप्रमुख आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना दिला जातो. पीएम मोदींपूर्वी हा सन्मान बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या व्यक्तिमत्त्वांना दिला गेलाय. कुवेतची सरकारी वृत्तसंस्था कुनाने दिलेल्या माहितीनुसार, हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांमधील चांगले संबंध दृढ करण्यासाठी देण्यात आलाय. पंतप्रधान मोदींना कोणत्याही देशाने दिलेला हा 20 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.