बबन शिंदेंनी अभिनंदन केलं नाही मीच त्यांना भेटायला जाणार; अभिजित पाटलांनी क्लिअर सांगितलं
Abhijit Patil News : बबन शिंदे (Abhijit Patil) यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला नाही, आशिर्वादही दिला नाही, आता मीच त्यांना भेटायला जाणार असल्याचं शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटलांनी लेटस्अप मराठीशी बोलताना सांगितलंय. दरम्यान, सहावेळा आमदारकी भुषविलेले माजी आमदार बबन शिंदे यांनी यंदा आपले चिरंजीव रणजीत शिंदे यांनी रिंगणात उतरवले होते. बबन शिंदे यांच्याबाबत अभिजित पाटलांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी मी बबन शिंदेंना भेटायला जाणार असल्याचं सांगितलंय.
विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला; खातेवाटपात नवं गणित
आमदार पाटील म्हणाले, विधानसभा निवडमुकीत मला धाकधूक नव्हती, समोर कोण आहे, यापेक्षा मी कोण आहे. मी काय करु शकतो. प्रश्न कसे मार्गी लावू शकतो, याकडं माझं लक्ष होतं. लोकं पवारासाहेबांच्या दारात तिकीटासाठी बसली होती. महायुतीचे असतानाही ते बसले होते. महायुती सोडून त्यांना पवारांकडे जावं लागलं
याचा अर्थ ते घाबरले होते ते निवडून येणार नाहीत हे त्यांना माहित होतं. बबन शिंदे यांनी मला फोन करुन अभिनंदन केलेलं नाही, आता मीच त्यांना भेटायला जाणार असल्याचं अभिजित पाटलांनी स्पष्ट केलंय.
मोठी बातमी! यु्क्रेनचा रशियावर ९/११ सारखा हल्ला; इमारतींवर ड्रोन अटॅकने खळबळ Video
तसेच सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 4 आमदार निवडून आले आहेत. या निवडणुकीत पवारांना मानणारा माढा मतदारसंघ आहे. माढ्यातून शरद पवार पूर्वी खासदार होते. शरद पवारांबद्दल सहानुभूती आहेस, त्यामुळे तरुण उमेदवारांना लोकांनी निवडून दिलं असल्याचं अभिजित पाटलांनी लेटस्अपशी बोलताना सांगितलंय.
मतदारसंघाच्या प्रश्न मांडण्यासाठी विधीमंडळात वेळ अपुरा मिळत आहे. नवीन आमदार असल्याने आम्हाला वेळ कमी मिळतो, तर सिनिअर आमदारांना जास्त वेळ दिला जातो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारने भूमिका स्पष्ट करावी, माझ्या मतदारसंघात उपसा सिंचनासाठी निधी मिळाला पाहिजे, सरकारने ऊसाच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन एमएसपी वाढवावी, बजेटवर काही विषय मांडले आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची परिक्षा झाली पण अद्याप निकाल जाहीर झालेला नाही, त्यामुळे मुलांचे अनेक प्रश्न रखडले असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलंय.