हे कपडे घे अन् तूला आमदार व्हायचंय; वडिलांबद्दल सांगताना आमदार अभिजित पाटील भावूक
Mla Abhijit Patil News : विजयसिंह मोहिते पाटलांनी (Vijay Sigh Mohite Patil) जिथून कपडे घेतले त्याच ठिकाणाहून मला वडिलांनी कपडे आणून देत तूला आमदार व्हायचंय, अशी आठवण शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितलीयं. आमदार झाल्यानंतर अभिजित पाटील यांचं हे पहिलंच अधिवेशन होतं. या अधिवेशनादरम्या, त्यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधलायं.
VIDEO : ठाकरे बंधूंचे सूत जुळले? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत दिसले एकत्र, चर्चांना उधाण
आमदार पाटील म्हणाले, माझे वडिल वकील होते, मीदेखील वकीलच व्हावं, असं त्यांना वाटत होतं. मात्र, मी राजकीय नेत्यासारखं मेळावे, समाजकार्य करत होतो. एके दिवशी वडिलसोबत असताना आमची विजयसिंह मोहिते पाटलांची भेट झाली. एका दुकानात ते कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. माझ्या वडिलांनीही मला त्याचं दुकानातून अगदी तसेच कपडे घेऊन मला दिले आणि म्हणाले हे घे कपडे आता तूला आमदार व्हायचंय, असं अभिजित पाटलांनी सांगितलंय.
धनंजय मुंडे आता पुरवठा मंत्री, खातेवाटप जाहीर होताच अजितदादांचं नाव घेत म्हणाले, मी..
तसेच मी 2005 साली ग्रामपंचायत निवडणूक लढलो, त्यानंतर मी ग्रामपंचायत सदस्य झालो होतो. त्यानंतर 2006 साली वडील वारले. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तब्बल 21 वर्षे लागलीयं, आमदार होताच पहिला फोन आईला केला, त्यावेळी माझ्या आणि आईच्या डोळ्यातून पाणी आलं असल्याचं भावूक होत आमदार अभिजित पाटलांनी सांगितलंय.
आमदार पहिले पाच प्रश्न मार्गी लावणार…
उजनी धरणावर पर्यटनस्थळ विकसित व्हायला हवं, सोलापुरातील मेंढापूरमध्ये एमआयडीसी झाली पाहिजे. सेना माढा उपसा सिंचन योजनेतून काही गावांना पाणी पोहोचायचं बाकी आहे त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असून भीमा आणि सीना नदीवर 10 मीटर उंचीचे हायड्रोलिक बंधारे बांधून अधिकचं पाणी साठलं पाहिजे. माढ्यात उपळाई गावात बडे अधिकारी आहेत, त्या ठिकाणी माढा पॅटर्न म्हणून अभ्यासिका सुरु करायची असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय.