खेड बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीचा वाद संपेना; आता तर सभापतींचा आमदार मोहितेंना कारवाईचा थेट इशारा

  • Written By: Published:
खेड बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीचा वाद संपेना; आता तर सभापतींचा आमदार मोहितेंना कारवाईचा थेट इशारा

पुणे जिल्ह्यातील खेड (Khed) कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती-उपसभापती निवडणूकही थेट उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात गेली होती. त्यानंतर बाजार समितीत सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे विजयसिंह शिंदे (VijaySinh Shinde) पाटील हे सभापती झाले. परंतु अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी पुन्हा आमची सत्ता आली असून, आमचा माणूस कैलास लिंभोरे हे पुन्हा सभापती झाल्याचा दावा दिलीप मोहिते यांनी सोशल मीडियावर केला होता. त्यावर बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे या पत्रकार परिषदेत हा दावा चुकीचा आहे. केवळ विधानसभा निवडणूक काढून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप सभापती शिंदे यांनी केला आहे.


पंतप्रधान मोदींच्या सभांनी महाराष्ट्रात वारं फिरणार? 8 दिवस तळ ठोकणार, भाजपची जय्यत तयारी

बाजार समितीचे पदाधिकारी निवडीबाबतची याचिका ही उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टात दाखल होती. निवडणूक झाल्यानंतर याचिका दाखल करणाऱ्यांनी ती स्वतःहून काढून घेतली आहे. सध्याच्या घडीला बाजार समितीबाबत कुठलेही केस न्यायालयाच दाखल नाही. परंतु तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडून माझ्याच माणूस पुन्हा सभापती झाल्याचे सांगितले आहे. त्यांना आता कायद्याचे भाषा समजत नाही. त्यांना इंग्लिशही कळत नाही, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.

“मनापासून प्रयत्न केल्याने मला…,” ‘गुम है किसीके प्यार में’फेम रजतने मराठी शिकण्याचा अनुभव केला शेअर

शिंदे म्हणाले, कोर्टातील याचिका त्यांनी काढून घेतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीवर तोंडावर धांदात खोटे बोलत आहेत. निवडणुकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनतेमध्ये वेगळे नॅरेटिव्ह सेट करायचे आहे. वेगळे वातावरण तयार करून निवडणूक काढून घ्यायची आहे. जनतेने खेड तालुक्याचा लोकप्रतिनिधीला अनेकदा निवडून दिले आहे. त्यांना मंत्री व्हायचे पण निवडणुकीपूर्वी बाजार समितीचे सत्ता गेले आहे. त्याचे शल्य आहे. राजकारणात पराभव स्वीकारला पाहिजे. पण आता चुकीचे पसरविले जात आहे. तुम्ही राजकारणात परिपक्वत्वा दाखविली पाहिजे. विशेष न्यायालयाचा भूमिका अपमान गैरसमज आहे. कायदेशीर बाब तपासल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. तुमचा जुना कारभार कसा झाला आहे. मार्केट कमिटीची गाडी कुठे-कुठे गेली ही सर्व माहिती आहे. सर्व विषय आमच्याकडे आहे, असा दावाही शिंदे यांनी केला आहे.


वाद काय आहे ?

बाजार समितीचे पदाधिकारी निवड करण्यासाठी शिंदे यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाविरुद्ध आमदार मोहिते समर्थक हे सुप्रिम कोर्टात गेले होते. तोपर्यंत सभापती निवड झाली होती. त्यानंतर मोहिते यांच्या समर्थकांकडून याचिका काढून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे मोहिते समर्थकांना आता न्यायालयात किंवा जिल्हा उपनिंबधक यांच्याकडे जाता येणार नाही, असा दावाही शिंदे यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube