पंतप्रधान मोदींच्या सभांनी महाराष्ट्रात वारं फिरणार? 8 दिवस तळ ठोकणार, भाजपची जय्यत तयारी
Vidhansabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला. अनेक पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात कुठं-कुठं प्रचार सभा घ्यायच्या याचे नियोजन पक्षांकडून केलं जातंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. दरम्यान, महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महाराष्ट्रात 8 दिवस जाहीर सभा घेणार आहेत.
“मनापासून प्रयत्न केल्याने मला…,” ‘गुम है किसीके प्यार में’फेम रजतने मराठी शिकण्याचा अनुभव केला शेअर
पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग आठ दिवस महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात मोदींच्या सभांचा धडाका असणार आहे. मोदींच्या विभागनिहाय सभा होणार आहे. फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभा होणार आहेत. 14 नोव्हेंबरनंतर पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असल्यानं सभांना कमी कालावधी मिळणार आहे. मात्र, या कालावधीतही मोदींच्या जास्तीत जास्त सभा कशा घेतल्या जातील, याकडे भाजपचा कल आहे.
संग्राम जगताप हॅट्रिक मारणार? महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल
मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यामुळे मुंबईत किमान दोन सभा होऊ शकतात. पुण्यात 6 विधानसभा मतदारसंघ असल्याने त्यामुळं तिथं एखादी सभा तर ठाणे जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांसाठीही मोदी सभा घेतील. त्यानंतर मराठा आरक्षणामुळे संवेदनशील असलेल्या मराठवाड्यात, त्यानंतर काँग्रेसने लोकसभा जिंकलेल्या विदर्भ आणि कोकणातही मोदींच्या सभा होऊ शकतात.
दरम्यान, भाजपकडून सभांची प्रत्यक्ष ठिकाणं अद्याप भाजपकडून निश्तित झालेली नाहीत. परंतु वर उल्लेख केलेल्या भागात एकापेक्षा अनेक उमेदवारांसाठी एकत्रितपणे या सभा होऊ शकतात.
महायुतीकडून 182 उमेदवारांची यादी जाहीर
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. यासोबतच परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही स्वबळावर निवडणूक लढवताना दिसणार आहेत. महायुतीने आतापर्यंत 182 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने 99 उमेदवार, शिवसेना शिंदे गटाने 45 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने 38 उमेदवार जाहीर केले आहेत.