VIDEO : ठाकरे बंधूंचे सूत जुळले? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत दिसले एकत्र, चर्चांना उधाण
Raj Thackeray And Uddhav Thackeray Together At Mumbai : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या विरोधात होते. त्यांच्यातील संघर्ष हा संपूर्ण राज्याने पाहिलेला आहे. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मुंबईतील एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र आलेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
“..म्हणून एक-एक खातं देण्याची वेळ फडणवीसांवर आली”, अजित दादांचा खुलासा
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या विरोधात असले तरी दोन्ही नेते कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसतात. हे दोन्ही नेते बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा एकत्र दिसले (Maharashtra Politics) आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसत आहेत. उद्धव फोनवर व्यस्त होते, तर राज ठाकरे त्यांच्या शेजारी उभे होते. दोन्ही भावांमध्ये कितीही राजकीय मतभेद असले तरी ठाकरे घराण्याची ताकद कायम असल्याचे या चित्रावरून दिसून येते.
मुंबईत एका लग्नसोहळ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र दिसले. राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नसोहळा होता. #RajThackeray #Thackerayfamily #UddhavThackeray #politics pic.twitter.com/rU6ehQDmb1
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 22, 2024
महाराष्ट्रातील एका कौटुंबिक लग्नात ठाकरे बंधूंची भेट झाल्याची माहिती मिळतेय. मुंबईत एका लग्नसोहळ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र दिसले. राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नसोहळा होता. हा कार्यक्रम मुंबईतील दादर भागात होता. राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात ठाकरे कुटुंब एकत्र दिसलं.
शिंदेंची खेळी यशस्वी? अजितदादांकडं तिजोरीच्या चाव्या पण, खर्च शिंदेच करणार
या लग्नसोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे उपस्थित होते. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांशी संवाद साधलाय. आठ दिवसापूर्वी देखील हे दोन्ही कुटुंब ताज लॅंड्स या हॉटेलमध्ये देखील एकत्र आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नाला हजेरी लावली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहिण जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाचं आज दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्नकार्य संपन्न झालं. याप्रसंगी
दोन्ही ठाकरे बंधूंनी शेजारी – शेजारी उभे राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. यादरम्यान दोन्ही कडील ठाकरे कुटुंब उपस्थित होते. आणि अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणात वावरताना दिसलं. वास्तविक राजकारणात हे दोन्ही कुटुंब एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना कौटुंबिक कार्यक्रमात मात्र हे गुण्या गोविंदाने एकत्र आलेले आज पाहायला मिळाले
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं, यासाठी दोघांचेही समर्थक देव पाण्यात ठेवून आहेत. अशा परिस्थितीत राजकीयदृष्ट्या या दोघांची युती, अद्याप दृष्टीपथात नसली, तरी सुद्धा कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने हे दोघं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी दोन्ही बाजूने होत आहे.
विधानसभेत माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवलं होतं. अमित विरुद्ध उद्धव काका (उद्धव ठाकरे) हे उमेदवार देणार नाहीत, अशी अपेक्षा असताना त्यांनी महेश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि विजयी केलं. हा पराभव राज ठाकरे यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या जिव्हारी लागला आहे. इतकेच नाही तर राज ठाकरे यांच्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. या कारणाने हे दोघे बंधू आता एकत्र येतील का? हे बघणं महत्वाचे ठरणार आहे
आता काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येवून ठेपल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू आहेत. आजच्या या लग्नातील व्हिडिओमुळे ठाकरे बंधूंचे सूत जुळले का? या चर्चांना आणखीनच उधाण आलंय.