Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे हेच प्रचारप्रमुख?
Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाविकास आघाडीनेही (Mahavikas Aghadi) निवडणूक रणनीतीसाठी चांगलीच आघाडी घेतली. मविआच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असतील, अशा चर्चांना उधाण आलं.
Thangalaan OTT: आता ओटीटीवर दिसणार ‘थंगालन’चा थरार; कधी अन् कुठे पाहता येईल चित्रपट?
विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली. महाविकास आघाडी आणि महायुतीने या निवडणुकीसाठी जोददार कंबर कली. मविआचे सरकार असतांना ठाकरेंनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळे त्यांच्या हाती मविआच्या विधानसभआ निवडणुकीच्य्या प्रचार प्रमुखाचं काम देण्याचा विचार कॉंग्रेस पक्षाच्या हायकमांडने केला असल्याची माहिती आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत विचार केला जाईळ. त्यामुळे फक्त प्रचारप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावे, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
Shriya Pilgaonkar : श्रियाचा बोल्ड अन् बिंधास्त अंदाज पाहून चाहते फिदा…
महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढं करून निवडणुकीला सामोरे जावं, यासाठी ठाकरे गट आग्रही होता. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा झाला. त्यात त्यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. संजय राऊत यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी मविआचा चेहरा बनवण्याची मागणी होती होती. मात्र काँग्रेसने त्यास नकार दिला. पण, महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वावर अनेकांचा विश्वास आहे. त्यामुळे निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडेच असावी, अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली.
तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्यावर काम करणार आहेत. त्यांच्याकडून लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा तयार केला जाईल.
दरम्यान, प्रचार प्रमुखांबाबत महाविकास आघाडीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीची पहिली संयुक्त बैठक उद्या मुंबईत होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीकडून प्रचार प्रमुख म्हणून ठाकरेंची अधिकृत घोषणा होईल का? हे पाहावे लागेल.