‘अभिजीत पाटील यांनी फडणवीस यांच्या पायावर लोळण घेतली’

‘अभिजीत पाटील यांनी फडणवीस यांच्या पायावर लोळण घेतली’

Bhagirath Bhalke on Abhijit Patil : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अभिजीत पाटलांच्या पक्ष प्रवेशाने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) नाराज झाले होते. यानंतर भगीरथ भालके हे राष्ट्रवादी (NCP) सोडणार असल्याच्या चर्चांना उधाणं आलं होतं. दरम्यानच्या काळात भगीरथ भालकेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. मात्र आता भगीरथ भालके यांनी अभिजीत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Bhagirath Bhalke’s big claim regarding the meeting of Abhijit Patil and Devendra Fadnavis)

सागर बंगल्यावर जाऊन अभिजीत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले आणि माझा पक्ष प्रवेश फसवून झाला असल्याचे सांगितले, असा दावा भगीरथ भालके यांनी केला आहे. सात तारखेला शरद पवार यांच्या उपस्थित अभिजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. त्यावेळी आम्ही सर्वांनी त्यांचे पक्षात स्वागत आहे अशी भूमिका घेतली होती. पण पक्ष प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी अभिजीत पाटील हे सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले आणि मला फसवून पक्ष प्रवेश झाला असे सांगितले, असा दावा भगीरथ भालके यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच्या खजिन्याच्या चाव्या सुनील तटकरे यांच्याकडे…

ते पुढं म्हणाले की अभिजीत पाटील असं म्हणाले नसतील किंवा पाया पडले नसतील तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात येऊन जाहीरपणे सांगाव. जर त्यांनी पाया पडलो नाही म्हणून सांगितले तर आम्ही त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि इन-आउट केलेलं रजिस्टरच्या नोंदी दाखवू. हे दाखवण्याची जबाबदारी त्याठिकाणी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याने घेतली आहे. त्यामुळे एकदा होऊन जाऊद्या कोण खरं, कोण खोटं आहे, असे भगीरथ भालके यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी दोनदा ‘मातोश्री’ला केलं होतं गुडबाय! राणेंनी सांगितली Unseen स्टोरी

दरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणातील पक्षप्रवेश सोहळ्यातच शरद पवारांनी अभिजीत पाटलांना विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. यानंतर भगीरथ भालके यांच्यासह कल्याणराव काळे आणि युवराज पाटील ही नेतेमंडळी नाराज झाले होते.

यानंतर शरद पवारांनी सोलापूर दौऱ्यात सर्व नाराजांना बोलावून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यामध्ये फारसे यश आले नव्हते. यानंतर भगीरथ भालके हे राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांना उधाणं आलं होतं. दरम्यानच्या काळात भगीरथ भालकेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. भगीरथ भालके यांनी यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून ते सध्या ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत असल्याचे समजते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube