राष्ट्रवादीच्या खजिन्याच्या चाव्या सुनील तटकरे यांच्याकडे…
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोठा निर्णय जाहीर केला. त्यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची घोषणा केली. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, पंजाब व हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात व गोवा या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता पक्षातील नेते सुनील तटकरे यांच्यावर देखील एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ( Sunil Tatkare Appointed as Treasurer of NCP )
पवार म्हणजे वैचारिक व्हायरस; सदावर्तेंनी ‘गुण’ उधळले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी निवडणुका आणि पक्षा संघटनामध्ये बदल करण्याच्या उद्देश्याने आता राष्ट्रवादीच्या खजिन्याच्या चाव्या सुनील तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आल्या आहेत. तटकरेंवर ही जबाबदारी सोपविणारं एक अधिकृत पत्र पक्षाकडून काढण्यात आलं आहे. त्यानुसार आता सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खजिनदार असणार आहेत.
काय म्हटले आहे राष्ट्रवादीच्या या पत्रात?
सुनील तटकरे, तुम्हाला कळविण्यात येते की, तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खजिनदार पदी नियुक्ती करण्यात येत आहे. तात्काळ ही नियुक्ती करण्यात येत आहे. यासाठी तुम्हाला शुभेच्छा! त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खजिनदार सुनील तटकरे असतील तर त्यांच्याकडेच पक्षाच्या अर्थिकबाबींच्या चाव्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.
उद्धव ठाकरेंनी दोनदा ‘मातोश्री’ला केलं होतं गुडबाय! राणेंनी सांगितली Unseen स्टोरी
दरम्यान मागच्या महिन्यात शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी आपण पक्षाचा राजीनामा देणार असे म्हटले होते. त्यानंतर एकच कल्लोळ उडाला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत शरद पवारांनी राजीनामा घ्यावा, असे म्हटले होते. त्यानंतर पक्षाच्या कमिटीने त्यांचा राजीनाम नामंजूर केला होता. या सगळ्यानंतर पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शरद पवारांनी थेट सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे. तर आता सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.