प्रकाश सुर्वे अन् शिवतारेंना DCM शिंदेंचा श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला, म्हणाले, ‘दुसऱ्या टप्प्यात दोघेही…’

  • Written By: Published:
प्रकाश सुर्वे अन् शिवतारेंना DCM शिंदेंचा श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला, म्हणाले, ‘दुसऱ्या टप्प्यात दोघेही…’

Eknath Shinde : राज्यात नवं महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेल्या राज्याला 39 मंत्री मिळाले. मात्र, मंत्रिपदी वर्णी न लागल्याने बरेच आमदार आमदार नाराज आहेत. त्यात अजित पवार गटाचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आघाडीवर आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचेही काही आमदारही नाराज असल्याचं पुढं आलं. या नाराज आमदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली. दरम्यान, या नाराजीनाट्यावर आता उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.

महिलेने पार्सल उघडताच आढळला मृतदेह, सोबत दीड कोटींच्या खंडणीचे पत्र, काय आहे नेमकं प्रकरण? 

शिंदे गटात नाराज कोण?
शिंदे गटातील 12 जणांना मंत्री करण्यात आले. त्यामुळे काही आमदार नाराज असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे गेल्या अडीच वर्षाच्या काळात मंत्री असलेले तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. तर माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार भोंडेकर यांची वर्णी न लागल्याने ते सर्वजण नाराज होते.

श्रद्धा आणि सबुरी ठेवा…
दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदेंनी शुक्रवारी नागपुरात नाराज असलेले आमदार विजय शिवतारे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार भोंडेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याची सूचना केली. पहिल्या टप्प्यात म्हणजे अडीच वर्षांसाठी काही जणांना संधी देण्यात आलीये, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काही जणांना मंत्री करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवतारे आणि सुर्वे यांना संधी दिली जाईल, असं शिंदेंनी सांगितलं.

नाराज आमदारांना दुसऱ्या टप्प्यात मंत्री करू…
या शिवसेना आमदारांची नाराजी दूर केल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पदे येतात आणि जातात. ज्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आलंय त्यांच्यात क्षमता आहे आणि ज्यांना दिलं नाहीये, त्यांच्यात क्षमता नाही, असं म्हणायचं कारण नाही. आमच्याकडे संख्या जास्त आहे. काहीवेळा काही लोकांना श्रध्दा आणि सबुरी ठेवावी लागते. पहिल्या टप्प्यात मंत्री न झालेले आमदार पक्ष आणि संघटनेसाठी काम करतील. त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी देऊन आणि पहिल्या टप्प्यातील आमदारांना तेव्हा पक्षाचं काम करायला सागू. हीच कामचाी पद्धत आहे, असं शिंदे म्हणाले.

ते म्हणाले, विजय शिवतारेंनी येऊन मला सांगितले की मला एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू सहकारी या पदाशिवाय दुसरं काही नको, हेच सर्वात मोठं पद आहे. प्रकाश सुर्वे यांनीही येऊन मला तेच सांगितले. आता हे लोक जोमाने काम करतील, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

एकही योजना बंद होणार नाही…
पुढं ते म्हणाले, राज्यातील महायुती सरकारच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे येत्या काळात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या योजना सुरूच राहणार आहेत. यातील एकही योजना बंद केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube