महिलेने पार्सल उघडताच आढळला मृतदेह, सोबत दीड कोटींच्या खंडणीचे पत्र, काय आहे नेमकं प्रकरण?

  • Written By: Published:
महिलेने पार्सल उघडताच आढळला मृतदेह, सोबत दीड कोटींच्या खंडणीचे पत्र, काय आहे नेमकं प्रकरण?

Dead body found in parcel: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका महिलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Dead body ) असलेले पार्सल (parcel) मिळाल्याने तिला धक्का बसला. इतकंच नाही तर मृतदेहासोबत एक पत्रही होते, ज्यात 1.30 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलीये. या घटनेनंतर महिला आणि तिचे संपूर्ण कुटुंब घाबरले असून त्यांना तात्काळ या प्रकणाची पोलिसांना ( Andhra Police) माहिती दिली.

राही किंवा माही प्रेमासाठी अनुपमा कोणाची करणार निवड करणार? जबरदस्त प्रोमो रिलीज 

पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंडी मंडलातील येंदागांडी गावात ही घटना घडली. नागा तुलसी नावाच्या महिला सरकारने मंजूर केलेल्या जागेवर घर बांधत होती आणि घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीसाठी क्षत्रिय सेवा समितीशी संपर्क साधला होता. तिने क्षत्रिय सेवा समितीकडे रिसतर अर्जही केला होता. समितीने महिलेला फरशा पाठवल्या होत्या. या बांधकामासाठी महिलेने पुन्हा क्षत्रिय सेवा समितीकडे मदतीचे आवाहन केलं होतं. समितीने विद्युत उपकरणे देण्याचं आश्वासन दिले होते. महिलाला व्हॉट्सॲपवर दिवे, पंखे, स्विचेस यांसारख्या वस्तू पुरवल्या जातील, असा मेसेज आला.

कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने हटवा, खा. लंकेंची मंत्री गोयल अन् जितिन प्रसाद यांच्याकडे मागणी… 

दरम्यान, गुरुवारी रात्री एका व्यक्तीने नागा तुलसी या महिलेला एक बॉक्स आणून दिला. त्यात विद्युत उपकरणे असल्याचे सांगून तो इसम निघून गेला. नंतर तुलशीने पार्सल उघडले आणि त्यात एका व्यक्तीचा मृतदेह पाहून तिला धक्काच बसला. या संपूर्ण घटनेने तिचे कुटुंबीयही घाबरले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अदनान नईम अस्मी यांनीही गावाला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. पार्सलमध्ये एक पत्रही सापडले असून, त्यात 1.30 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही कुटुंबियांना देण्यात आला आहे.

दरम्यान, पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह सुमारे ४५ वर्षांच्या व्यक्तीचा आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. हे खुनाचे प्रकरण आहे का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube