Sonu Sood : आंध्र प्रदेशातील एका मुलीच्या शिक्षणासाठी सोनू सूदच अनोखं योगदान

Sonu Sood : आंध्र प्रदेशातील एका मुलीच्या शिक्षणासाठी सोनू सूदच अनोखं योगदान

Sonu Sood : बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर (social media) नेहमी सक्रिय असतो. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदत केली. सोनूनं अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. सोनूच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची मोठी पसंती मिळते. अलीकडच्या एका कृतीने तो राष्ट्रीय नायक का मानला जातो हे पुन्हा सिद्ध केले आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एका विद्यार्थिनीला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी त्याने सोशल मीडिया वापरकर्त्याने जनतेच्या नायकाशी संपर्क साधला.


सध्या व्हायरल होत असलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत दिसत आहे. पोस्टमध्ये लिहिले होते, “ती खूप गरीब आहे आणि तिला बीएससीचा अभ्यास करायचा आहे. सोनू सर तुम्ही काहीही करू शकता. कृपया या मुलीला मदत करा.” पोस्टच्या उत्तरात सूदने लिहिले की, “तिला तिच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल याची मी खात्री देतो.

गेल्या काही दिवसापूर्वी ओडिशातील बालासोरयेथील रेल्वे अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारोंच्या घरात लोक गंभीर जखमी आहेत. या अपघाताच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ओडिशामध्ये झालेल्या या रेल्वे अपघातावर सलमान खान, सोनू सूदसह ज्युनियर एन्टीआरपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला होता.

निवडणुकीतील यशासाठी Sonu Sood ने केलं एन. चंद्राबाबू नायडूंचे अभिनंदन!

दरम्यान, सोनू सूद सध्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा पदार्पण करणार आहे. यात कोणते कलाकार महत्त्वाच्या भूमिका करणार आहेत. याबाबत कोणतेही माहिती समोर आली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube