Sonu Sood: ‘फतेह’ सिनेमासाठी अभिनेता सोनू सूदने केलं असं वर्कआऊट, पाहा व्हिडिओ

Sonu Sood: ‘फतेह’ सिनेमासाठी अभिनेता सोनू सूदने केलं असं वर्कआऊट, पाहा व्हिडिओ

Sonu Sood’s Fitness: बॉलिवूडसह (Bollywood)साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद (Sonu Sood). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारा सोनू सूद गेल्या काही वर्षांपासून त्याच्या जनसेवेसाठी ओळखला जात आहे. सोनू सूद याने लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात अनेकांची मदत केली होती. त्याच्या या मदतीमुळे अनेक जण आज ही त्याच्या घराबाहेर मदतीसाठी, आभार व्यक्त करण्यासाठी जमा होत असतात. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आता स्वत:ला फिटनेस आयकॉन असल्याचे सिद्ध करून सोनू सूदने अनेकदा त्याच्या वर्कआउटची झलक शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


प्रत्येकवेळी तो बॉलीवूडमध्ये फिट राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. त्याचा वर्कआउट व्हिडिओ (Workout Video)मधून सगळेच कायम प्रेरणा घेतात. अलीकडे अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ‘फतेह’च्या तयारीसाठी कशी तयारी केली हे दाखवलं. व्हिडिओमध्ये सोनू सूद कमालीचं वर्कआऊट करताना दिसत आहे. टोन्ड बॉडी आणि वॉशबोर्ड ॲब्स फ्लाँट तो यात दाखवत आहेत. व्हिडिओ शेअर करताना सोनू सूदने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की ‘माझा दिवस 22 तासांचा आहे आणि 2 तास माझ्या फिटनेससाठी आहे.

जनमानसातील नायकाने हा व्हिडिओ शेअर करताच अनेक चाहत्यांनी यावर कॉमेंट्स केल्या आहेत. सोनू सूदच्या पहिल्या दिग्दर्शनाचा उपक्रम असलेल्या ‘फतेह’ बद्दल बोलताना अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासोबत सायबर क्राइम थ्रिलरमध्ये स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

निवडणुकीतील यशासाठी Sonu Sood ने केलं एन. चंद्राबाबू नायडूंचे अभिनंदन!

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूद एका लहान मुलाच्या मदतीसाठी धावला आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा फूड स्टाॅल सांभाळणाऱ्या या मुलाचे नाव जसप्रित असं आहे. त्याचा व्हिडीओ पाहून थेट सोनू सूद हा या मुलाच्या मदतीला धावून गेला होता. सोनू सूदने मुलाचा व्हिडीओ रीट्विट केला. यात त्यानं लिहलं होत की, ‘आधी शिक्षण घेऊया मित्रा. मोठं झाल्यावर यापेक्षाही मोठा व्यवसाय करशील’. सोनु सूदने जसप्रीतशी संपर्क संवाद साधला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज