मोठी बातमी! यु्क्रेनचा रशियावर ९/११ सारखा हल्ला; इमारतींवर ड्रोन अटॅकने खळबळ Video
Kazan Drone Attack : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ला आठवतोय का अगदी त्याच पद्धतीने हल्ला झाल्याची (Kazan Drone Attack) घटना घडली आहे. युक्रेन आणि रशियात दोन वर्षांनंतरही युद्ध सुरुच (Ukraine Russia War) आहे. युक्रेन आता रशियातील शहरांना टार्गेट करू लागला आहे. अमेरिकेची मदत आणि घातक मिसाइल्सचा वापर करण्याची मुभा मिळाल्यानंतर युक्रेन अधिकच आक्रमक झाला आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार युक्रेनने रशियावर ९/११ प्रमाणे हल्ला केला आहे. युक्रेनच्या सैन्याने कजान शहरातील तीन इमारतींवर ड्रोन अटॅक केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मोठी बातमी! रशियाकडून युक्रेनच्या पॉवर प्लांटवर हवाई हल्ला, 10 लाख लोक अंधारात
या ड्रोन्सने कझान शहरातील रहिवासी इमारतींना लक्ष्य केलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक ड्रोन एका उंच इमारतीला धडकताना दिसत आहे. ड्रोन धडकल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. या हल्ल्यांमुळे रशियात मोठी खळबळ उडाली असून यासाठी रशियाने युक्रेनला जबाबदार धरलं आहे.
विमानतळ तत्काळ बंद
या हल्ल्यानंतर कझान येथील विमानतळ तत्काळ बंद करण्यात आले आहे. एपीए वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार हल्ल्या दरम्यान कमलीव एवेन्यू, क्लारा जेटकिन, युकोजिंस्काया, हादी ताकतश, क्रास्नाया पॉजिसिया आणि ऑरेनबर्गस्की ट्रॅक्ट इमारतींना टार्गेट करण्यात आले. रिपब्लीक चीफ रुस्तम मिन्निकानोव म्हणाले, कजानमधील नागरिक राहत असलेल्या इमारतींवर झालेल्या हल्ल्यांत अद्याप कुणाचाही मृत्यू किंवा कुणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
WATCH: Drone flies into building in Kazan, Russia; no word on injuries pic.twitter.com/7AtJAo963T
— BNO News (@BNONews) December 21, 2024
या हल्ल्यानंतर शहरातील सर्व महत्वाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सुरक्षेचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. कझान हे रशियातील सर्वात सुरक्षित शहर मानले जात होते. परंतु, या हल्ल्याने आता ही धारणा कमकुवत झाली आहे. याच शहरात काही दिवसांपूर्वी ब्रिक्स संमेलन झालं होतं. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक दिवस आधीच सांगितलं होतं की युक्रेनने फिक्स्ड विंग युएवीचा उपयोग करुन रशियात दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आम्ही युक्रेनचे हे प्रयत्न हाणून पाडले. रशियाच्या एअर फोर्सने एकूण १९ युक्रेनी ड्रोन नष्ट केले.
संरक्षण मंत्रालयाच्या या निवेदनानंतर हा हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास आठ इमारतींना टार्गेट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार तीन इमारतींत स्फोट झाले आहेत. रिपोर्टनुसार कझान अजूनही भीतीचं वातावरण कायम आहे. कझान हे रशियातील आठव्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे. युक्रेनच्या या हल्ल्यानंतर आता रशिया काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.