‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ कारणाने कोकण हार्टेड गर्ल अंकिता ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची

‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ कारणाने कोकण हार्टेड गर्ल अंकिता ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची

Bigg Boss Marathi New Season Day 4: ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरात कधी काय वादळ येईल हे सांगू शकत नाही. सोशल मीडिया (Social media) गाजवणारी मालवणी चेडू अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धमाका करताना दिसून येत आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरला निक्की तांबोळीमुळे (Nikki Tamboli) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अश्रू अनावर झाले आहेत. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अंकिता रडत बसणार की सदस्यांना कोकणी हिसका दाखवणार हे पाहावे लागणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अंकिता निक्कीला म्हणते,”मला तुझ्यासोबत पाडापाडीचं काही खेळायचं नाही. तू माझ्यापासून लांब राहा”. त्यावर निक्की तिला म्हणते,”तू दूर जा…माझी मर्जी..तुला मला उचलून घ्यायचंच नाही आहे”. पुढे अंकिला तिला उचलून घेत म्हणते,”तुला आता मी असं उचलून घेऊ का?”. अंकिताने उचलून घेतल्याने निक्कीला राग येतो आणि ती म्हणते,”माझे हात पाहायचे आहेत का तुला कसे चालतात… परत हात लावलास तर तुझं तोंड मी खलबत्त्याने ठेचेल”. त्यानंतर अंकिता सर्व सदस्यांपासून दूर जाते आणि ढसाढसा रडते.

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू-वालावलकरने रितेश देशमुखसमोर गाऱ्हाणं घालत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश केला होता. पण हा मालवणी चेडू पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झाला आहे. आता अंकिता वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपणार की पुढे सुरू राहणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे.

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठी’च्या घरातलं पहिला मोठा राडा; आर्या अन् निक्कीमध्ये शाब्दिक चकमक

‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि कोल्हापूरच्या पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश आहे. आता या सहा सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube