IndiGo विरुद्ध मोठी कारवाई, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये उड्डाणांमध्ये 5% कपात

IndiGo Airlines : देशात सर्वात मोठी विमान सेवा देणारी कंपनी इंडिगोविरोधात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने मोठी कारवाई करत हिवाळ्याच्या

  • Written By: Published:
IndiGo Airlines

IndiGo Airlines : देशात सर्वात मोठी विमान सेवा देणारी कंपनी इंडिगोविरोधात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने मोठी कारवाई करत हिवाळी  हंगामासाठी एअरलाइन्सच्या उड्डाण वेळापत्रकात 5% कपात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी संकटात सापडल्याने देशात 8 दिवसांत 5 हजार पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाल्याने सरकारने इंडिगोविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

इंडिगो (IndiGo Airlines) सध्या 2200 हून अधिक उड्डाणे चालवते, परंतु मंत्रालयाने आता एअरलाइन्सचे स्लॉट इतर एअरलाइन्सना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात इतर कोणत्याही एअरलाइन्सना अशाच प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व एअरलाइन्ससोबत आढावा बैठकीनंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.

डीजीसीएने आढावा बैठकीनंतर निर्णय

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांनी डीजीसीएसोबत (DGCA) 8 डिसेंबर रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या प्रतिसादाचा आढावा घेण्यात आला आणि एअरलाइन्सविरुद्ध योग्य कारवाई करण्यावर चर्चा करण्यात आली.

Tamannaah Bhatia : व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया, भव्य पोस्टर प्रदर्शित

दरम्यान, आज, इतर एअरलाइन्ससोबत आढावा बैठकीनंतर, डीजीसीएने एअरलाइन्सचे मार्ग कमी केले. एअरलाइन्सचे कट केलेले स्लॉट आता इतर एअरलाइन्सना वाटले जातील. डीजीसीएने स्लॉट कपातीबाबत अधिसूचना पाठवली आहे.

तर दुसरीकडे केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांमुळे आणि क्रू मेंबरच्या कमतरतेमुळे इंडिगो कंपनीला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. देशभरात आठ दिवसात कंपनीने 5 हजारपेक्षा जास्त उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

follow us