10 लाखांपेक्षा कमी किंमत, फर्स्ट क्लास फीचर्स अन् शानदार मायलेज, ‘ह्या’ कार्स एकदा पहाच

10 लाखांपेक्षा कमी किंमत, फर्स्ट क्लास फीचर्स अन् शानदार मायलेज, ‘ह्या’ कार्स एकदा पहाच

Affordable CNG Cars: भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून सीएनजी कार्सची (CNG Cars) मागणी झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये एकापेक्षा एक मस्त मस्त सीएनजी कार्स लाँच होत आहे. जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारतीय बाजारात 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी काही जबरदस्त सीएनजी कार्स उपलब्ध आहे. ज्यांना तुम्ही खरेदी करण्याचा विचार करू शकतात. कंपनीकडून तुम्हाला या कार्समध्ये शानदार फीचर्ससह दमदार इंजिन आणि उत्तम मायलेज मिळतो. जाणून घ्या या कार्सबद्दल.

Hyundai Exter

काही दिवसांपासून Hyundai ने भारतीय बाजारात Hyundai Exter पेट्रोलसह सीएनजी व्हेरियंटमध्ये लाँच केली होती. ग्राहकांना या कारमध्ये कंपनीकडून 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आला आहे. बाजारात सीएनजीमध्ये ही कार एस आणि एसएक्स या दोन व्हेरियंटमध्ये उपल्बध आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 8.43 लाख रुपये आणि 9.16 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Brezza CNG

जर तुम्ही मारुती सुझुकीची सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Maruti Suzuki Brezza CNG सर्वात भारी पर्याय ठरू शकतो. या कारमध्ये तुम्हाला 1.5-लिटर इंजिन मिळतो. सीएनजीमध्ये ही कार भारतीय बाजारात 3 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरुम किंमत 9.29 लाख रुपये आहे.

Tata Punch CNG

टाटा देखील सीएनजी कार सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक कार्स ग्राहकांना ऑफर करत आहे. नुकतंच टाटाने सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी Tata Punch चं सीएनजी व्हेरियंट लाँच केला आहे. या कार मध्ये उत्तर फीचर्स आणि पावरफुल इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने प्युअर, ॲडव्हेंचर आणि ॲक्प्लिश्ड व्हेरियंटमध्ये ही कार सीएनजी सेगमेंटमध्ये लाँच केली आहे. बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 7.23 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.85 लाख रुपयांपर्यंत जाते.

Tata Tigor CNG

तुमचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार असेल तर Tata Tigor CNG तुमच्यासाठी एक बेस्ट कार ठरू शकते. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि पावरफुल इंजिन देखील कंपनीकडून देण्यात आला आहे. तुम्हाला भारतीय बाजारात ही कार खरेदीसाठी एक्स शोरुम 8.85 लाख रुपये मोजावे लागणार आहे.

IND Vs ZIM 2024 : झिम्बाब्वेवर 23 धावांनी विजय, शुभमन चमकला, मालिकेत भारताची आघाडी

Maruti Suzuki Fronx CNG

तुम्ही कमी किमतीमध्ये मारुतीची सीएनजी कार शोधात असाल तर बाजारात Maruti Suzuki Fronx CNG कार उपलब्ध आहे. डेल्टा आणि झेटा या दोन व्हेरियंटमध्ये कंपनी ही कार सीएनजी सेगमेंटमध्ये विक्री करत आहे. बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 8.46 लाख ते 9.32 लाख रुपये आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज