पुणे हादरलं! ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई केल्याने महिला पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

पुणे हादरलं! ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई केल्याने महिला पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

Pune Crime : पुण्यात सध्या धक्कादायक घटनांचं सत्र सुरू आहे. येथे आता एका व्यक्तीने पोलिसाच्या अंगावर पेट्रेल ओतत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायच प्रकार घडला आहे. (Pune Accident) दरम्यान या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दारूच्या नशेत असताना वाहन चालवलं म्हणून त्याला विश्रामबाग पोलीस स्टेशन नेलं होतं. त्यावेळी त्याने वेगवेगळे चाळे करत असल्याने पोलिसांनी त्याला समजावलं. दरम्यान, पोलिसांना हुलकावणी देत तो बाहेर गेला आणि त्याने बाटलीत पेट्रोल आणलं आणि अंमलदार सावंत आणि पीआय जानकर म्याडम यांच्यावर पेट्रोल ओतलं. त्यांना पेटवून देण्याचा त्याने प्रयत्न केला. (Pune Police) ही घटना विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली आहे.

आरोपीला अटक Video : मी फडणवीसांना मुख्यमंत्र्याचं मंत्री केलं लेट्सअप च्या दणकेबाज मुलाखतीत पवार काय म्हणाले?

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आरोपी संजय फकिरा साळवे (राहणार, पिंपरी चिंचवड (मूळगाव- जालना)) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

नेमकं घडलं काय?विश्व विजेता टीम इंडिया भिडणार झिम्बाब्वेशी, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना

काही दिवसांपासून पुण्यात ज्या काही घटना घडत आहेत. त्या घटनाच्यां पार्श्वभूमीवर पोलिसांना वरिष्ठांकडून रात्रीच्या वेळी बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, रात्रीच्या वेळी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना थांबून त्यांची तपासणी देखील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. अशीच नाकाबंदी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसाने एका गाडीला थांबवलं, गाडीची तपासणी केली. त्यावेळी ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्याला ड्रंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्यात विश्रामबाग पोलीस स्टेशनला आणलं होत. त्या दरम्यान त्याने हे कृत्य केलं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube