Pune Accident मधील अल्पवयीन मुलाला वेळ द्या, त्याच्यावरही आघात; उच्च न्यायालयाने मांडलं मत

Pune Accident मधील अल्पवयीन मुलाला वेळ द्या, त्याच्यावरही आघात; उच्च न्यायालयाने मांडलं मत

Pune Accident Teen too in Trauma give him time says High Court : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात (Pune Accident) प्रकरणाने राज्यासह देशभरात खळबळ उडाली. त्यातील कार चालक मुलासह अनेकजण या प्रकरणात अटक आहेत. आता यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) दोघांना उडवणाऱ्या अल्पवयीन तरूणाबद्दल मत मांडलं आहे. न्यायालयाने म्हटलं की, या तरूणावर देखील आघात झाला आहे. त्याला वेळ देण्यात यावा.

न्यायालयाने काय म्हटले?

पुण्यातील अपघात प्रकरणावर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात अल्पवयीन आरोपीच्या मावशीने दाखल केलेला याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती डोंगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने या तरुणाला निरीक्षण गृहात ठेवण्यात आलं त्यावर मत नोंदवलं आहे. न्यायालयाने म्हटलं की, या अपघातामध्ये अल्पवयीन तरुणांनी दोघांना चिरडल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. मात्र हा तरुण देखील अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याला वेळ देण्यात यावा. त्याच्या मनावरदेखील आघात झाला आहे.

अर्थतज्ज्ञांचा सल्ला करदात्यांना झटका देणार?; अन्य करांसोबत रोबोट टॅक्सही घ्या; अर्थमंत्र्यांकडे मागणी

दरम्यान या मुलाच्या मावशीने त्याला निरीक्षण गृहातून सोडण्याची मागणी केली आहे. तसेच न्यायालयाने पोलिसांना देखील सवाल केला आहे. की या तरूणाच्या जामीनाचा निर्णय कोणत्या कायद्यान्वये बदलण्यात आला. कारण तो रद्द करण्यात आला नसून केवळ तो बदलण्यात आला आहे. ज्यामुळे त्याच्या मुलभूत हक्काचं उल्लंघन झाल्याचं त्याच्या वकीलांनी म्हटलं आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘या’ दोन ट्रेन तीन दिवस रद्द

19 मे रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्श कारने एका दुचाकीला जबर धडक दिली होती. त्यात दोघांना मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तर त्याच्या वडील आणि आजोबांना अटक करण्यात आली. आतापर्यंत या अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या मित्रांचेही जबाब नोंदवण्यात आले होते.

नगर विधानसभेसाठी ठाकरे गट सक्रिय; जागा शिवसेनेला मिळवण्यासाठी माजी आमदाराच्या मुलाचं पत्र

मुलाची आई आणि वडील या दोघांनी मिळून हा कट रचला होता असेही आता स्पष्ट होत आहे. अपघात झाल्यानंतर शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल दोघेही ससून रुग्णालयात उपस्थित होते. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये विशाल अग्रवाल दिसत होता असेही आता समोर आले आहे. पोलीस चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेचा वेगाने उलगडा होत चालला आहे.

दरम्यान, अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील, आई आणि मुलाचे आजोबा या सगळ्यांनाच अटक झाली आहे. अल्पवयीन मुलाची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. काल त्याची आई शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दिल्यानंतर बदललेले रक्ताचे नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचे होते असा संशय पोलिसांना होती. याबाबत चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज