रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘या’ दोन ट्रेन तीन दिवस रद्द

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘या’ दोन ट्रेन तीन दिवस रद्द

Mumbai Pune Train Cancel : मुंबई-पुणे किंवा पुणे-मुंबई असा ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 28 ते 30 जून दरम्यान मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या दोन ट्रेन बंद राहणार आहेत. पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express) आणि डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) ट्रेन तीन दिवस रद्द असणार आहेत. पुणतांबा काणेगाव आणि दौंड मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणामुळं रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

नगर विधानसभेसाठी ठाकरे गट सक्रिय; जागा शिवसेनेला मिळवण्यासाठी माजी आमदाराच्या मुलाचं पत्र 

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 28, 29 आणि 30 जून रोजी पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या 2 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे मुंबई पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या तीन दिवस धावणार नाहीत. शुक्रवार (28) जून रोजी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. शनिवारी (29) जून रजोी मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. तर त्याच दिवशी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसही धावणार नाही. रविवार, 30 जून रोजी धावणारी मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.

आईने जन्म दिला तर संगीताने… World Music Day निमित्त बी प्राकने व्यक्त केल्या भावना 

इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस 3 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याने मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या दोन्ही ट्रेन अगदी कमी तासांमध्ये पुण्यावरून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईत आणि मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना पोहचवते. त्यामुळं या ट्रेनला प्रवाशांची चांगली पसंती असते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज