रेल्वे प्रवाशांसाठी नवा नियम! बॅगचं वजन वाढलं की प्रवाशांवर दंडाची कारवाई, लगेज बुकिंग सुविधा

रेल्वे प्रवाशांसाठी नवा नियम! बॅगचं वजन वाढलं की प्रवाशांवर दंडाची कारवाई, लगेज बुकिंग सुविधा

Indian Railways Regulate Luggage Weight : भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी सातत्याने नवे नियम लागू करत असते. त्याच पार्श्वभूमीवर आता रेल्वेने प्रवासादरम्यान नेण्यात येणाऱ्या सामानाच्या वजनावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला (Railway Luggage Weight) आहे. अगदी हवाई प्रवासाप्रमाणेच हा नियम लागू होणार असून, जड सामान घेऊन जाणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरावे (Indian Railways Regulate Luggage Weight) लागणार आहे.

किती मोफत सामान नेऊ शकता?

रेल्वेच्या नव्या नियमानुसार, डब्याच्या प्रकारानुसार सामान नेण्याची मर्यादा ठरवण्यात आली आहे –

– फर्स्ट क्लास एसी प्रवासी : 70 किलोपर्यंत मोफत सामान
– सेकंड एसी प्रवासी : 50 किलोपर्यंत मोफत सामान
– थर्ड एसी व स्लीपर प्रवासी : 40 किलोपर्यंत मोफत सामान
– जनरल डब्बा प्रवासी : 35 किलोपर्यंत मोफत सामान

याशिवाय, प्रत्येक प्रवाशाला 10 किलो अतिरिक्त सामान मोफत नेण्याची परवानगी (Train New Rule) असेल. मात्र त्यापेक्षा अधिक वजन झाल्यास ते बुक करावे लागेल.

ICC Womens Cricket World Cup साठी वुमन्स टीम जाहीर, हरमनप्रीतच्या आर्मीमध्ये कोण कोण?

नियम कुठे होणार लागू?

उत्तर रेल्वे व उत्तर मध्य रेल्वेने या नियमाची सुरुवात केली असून, पहिल्या टप्प्यात लखनौ, प्रयागराज, मिर्जापूर, कानपूर, अलीगढ या प्रमुख स्थानकांवर हा नियम काटेकोरपणे लागू होईल.
याशिवाय चारबाग, बनारस, प्रयागराज छिवकी, सूबेदारगंज, टूंडला, गोविंदपुरी, इटावा या स्थानकांचाही समावेश आहे.

‘पूप सूटकेस’! पुतिन यांच्या विष्ठेची रहस्यमय सफर, पोर्टेबल टॉयलेट ते ब्रीफकेसपर्यंत झेड प्लस सुरक्षा

लगेज बुकिंग सुविधा

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, प्रवासी अनेकदा अतिप्रमाणात सामान घेऊन डब्यांत चढतात. यामुळे केवळ बसण्याची व चालण्याची अडचणच होत नाही, तर सुरक्षेचाही धोका निर्माण होतो. म्हणूनच हा नियम कडकपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर सामानाची मर्यादा ओलांडली, तर प्रवाशाला अतिरिक्त शुल्क भरावं लागेल. एअरपोर्टसारखीच ‘लगेज बुकिंग सुविधा’ रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा जास्त वजन असलेले आणि नोंद न केलेले सामान आढळल्यास, प्रवाशाला सामान्य दरापेक्षा जास्त शुल्क भरावे लागेल.

इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे तपासणी

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक लगेज मशीन बसवण्यात येणार आहेत. या मशीनमुळे सामानाचे वजनच नव्हे, तर बॅगचा आकारही तपासला जाईल. म्हणजेच, वजन कमी असले तरी बॅगचा आकार मोठा असल्यास दंड भरावा लागू शकतो. लखनौ नॉर्दर्न रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम कुलदीप तिवारी यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी हा नियम महत्त्वाचा असून लवकरच सर्वत्र लागू केला जाईल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube