Western Railway block: पश्चिम रेल्वेवर सोमवारी चार तासांचा ब्लॉक; अनेक लोकल रद्द
Mumbai Local Block : आज सोमवार ( दि. 30 सप्टेंबर) रात्री 12.30 ते मंगळवारी सकाळी 4.30 या दरम्यान गोरेगाव आणि मालाड दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. रात्री शेवटची चर्चगेट-विरार लोकल रात्री 11.27 वाजता सुटेल. त्यानंतर रात्री एक वाजता चर्चगेट अंधेरी ही लोकल असेल. बोरीवलीहून चर्चगेटला रात्री 12.10 वाजता, तर गोरेगाव ते सीएसएटी रात्री 12.07 वाजता शेवटची लोकल सुटेल. उद्या मंगळवारी काही लोकल अतिरिक्त म्हणून चालवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ब्लॉकच्या कालावधीमध्ये काही रेल्वे पूर्णपणे तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या माहितीनुसार, १७५ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. 4 ऑक्टोंबरपर्यंत पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना अनियमित वेळापत्रकानुसार चालावं लागणार आहे. अप, डाऊन मेल आणि एक्स्प्रेस १० चे १२ मिनिटे उशिरा धावण्याची शक्यता आहे. तसंच, अप आणि डाऊन हार्बर लाईनवर 00:30 ते 10:30 वाजेपर्यंत 10 तासांचा मेजर ब्लॉक आणि अप आणि डाऊन जलद व धीम्या लाईनवर 00:30 ते 04:30 वाजेपर्यंत 04 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
एकनाथ शिंदे यांनाही आनंद दिघेंप्रमाणे संपवणारं होते; शिंदे गटाच्या नेत्याने केला खळबळजनक दावा
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 6 च्या लाईनचे बांधकाम सुलभ करण्यासाठी गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान आज 30 सप्टेंबर रोजी 21:30 ते 07:30 वाजेपर्यंत 5च्या लाईनवर 10 तासांचा मेजर ब्लॉक घेण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत 00.30 ते 04:30 वाजेपर्यंत 04 तासांच्या ब्लॉक दरम्यान फक्त चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरीवली दरम्यानच गाड्या चालवल्या जातील.चर्चगेट ते गोरेगाव, छ. शि. म.ट. ते गोरेगाव आणि पनवेल ते गोरेगावपर्यंत सर्व गाड्या अंधेरीपर्यंत धावतील आणि अंधेरीवरून रिवर्स होतील