आता ‘लेटमार्क’चं नो टेन्शन! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा; सरनाईकांची विधानसभेत घोषणा

आता ‘लेटमार्क’चं नो टेन्शन! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा; सरनाईकांची विधानसभेत घोषणा

Pratap Sarnaik Statement On State Employees Duty Time : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि अपघातांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना (Goverment Employees) अर्धा तास उशिरा कामावर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, मुंबईतील रेल्वेवरील ताण कमी करणे आणि कार्यालयांतील गर्दी टाळणे, हे या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लोकल अपघातांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ही घोषणा झाली. आता सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात अर्धा तास उशिरा हजर राहण्याची मुभा मिळणार असून, त्यांना यासाठी ‘लेटमार्क’ (Mumbai Local) लागणार नाही. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट विधानसभेत दिली आहे. खासगी कर्मचाऱ्यांसाठीही लवकरच टास्क फोर्स स्थापन करून वेळेचे पुनर्नियोजन करण्यात येईल, असंही प्रताप सरनाई यांनी जाहीर केलंय. मात्र, कामाचे एकूण तास तेवढेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, हा किरकोळ बदल असला तरी लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. तसेच, मेट्रोसारख्या पर्यायी वाहतूक पद्धती वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.

‘मी एका माणसाला भेटले… ज्याचं नाव होतं मोहित सूरी’; ‘सैयारा’च्या प्रदर्शनाआधी अनीत पड्डांची भावनिक पोस्ट

अर्धा तास उशिरा पोहोचण्याची परवानगी

मुंबईतील लोकल रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी या लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. मात्र दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, अपघातांची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या सर्व गोष्टींना अनुसरून महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात अर्धा तास उशिरा पोहोचण्याची मुभा देण्यात आली आहे. विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा करताना सांगितले की, मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन, सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कार्यालयात हजर राहण्याची परवानगी देण्यात येत आहे. यामुळे लोकलमधील गर्दी कमी होईल आणि अपघातांचे प्रमाणही नियंत्रणात येईल.

वाढत्या रेल्वे अपघातांचा मुद्दा

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना सरनाईक म्हणाले की, कार्यालयीन वेळा थोड्याशा लवचीक केल्या, तर हजारो कर्मचारी गर्दीच्या तासांत प्रवास करण्यापासून वाचू शकतील. अर्धा तास उशिरा कार्यालयात हजर होण्याची मुभा देण्यात येत असली, तरी कामाचे एकूण तास कमी होणार नाहीत. सायंकाळी तेवढाच वेळ वाढवून भरपाई करावी लागेल, असंही सरनाईकांनी स्पष्ट केलंय.

रिपब्लिकन सेनेशी संबंध तोडले! आंबेडकर-शिंदेंच्या युतीनंतर… वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय

खासगी क्षेत्रासाठी टास्क फोर्स

सरकारने संकेत दिले आहेत की, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही असाच लवचीक वेळेचा विचार केला जाईल. यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. ही टास्क फोर्स वेळेचे नियोजन, गर्दीचे विश्लेषण आणि वाहतुकीवरील प्रभाव यांचा अभ्यास करेल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube