पेरलं कुणी, मशागत कुणाची अन् बजरंगबाप्पा आले कापणीला; बीड-अहिल्यानगर रेल्वेवरून पंकजांचा टोला

Beed Ahilyanagar Railway चे उद्धाटन पार पडले. यावेळी पंकजा मुंडे यांनी बीड-अहिल्यानगर रेल्वेवरून बजरंग सोनवणे यांना टोला लगावला आहे.

Beed Ahilyanagar Railway

Beed Ahilyanagar Railway Inauguration Pankaja Munde Criticize Bajrang Sonawane : बीड जिल्ह्यामध्ये आज गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बीड-अहिल्यानगर रेल्वेचे उद्धाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्धाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी बीड-अहिल्यानगर रेल्वेवरून बजरंग सोनवणे यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

जे लोक या रेल्वेमध्ये बसणार आहेत. त्यांना या रेल्वेसाठी कुणी योगदान दिलं ते माहिती आहे. मी श्रेयाच्या विषयामध्ये जाणार नाही. मी जरी या जिल्ह्याची पाच वर्षे पालकमंत्री राहिले असले. तरी मी शेवटच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याची पालकच असेल. तसेच मला मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. म्हणून मी रेल्वेचे श्रेय केशरकाकू क्षीरसागर ते बजरंगबाप्पा सोनवणे यांच्या सर्वांना देते.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर टाकला लाल रंग; आक्रमक ठाकरे गटाची तक्रार, शिवाजी पार्कवर तणाव

तसेच मी म्हणाले की, या रेल्वेचं श्रेय एक वेळ मला देऊ नका पण आमच्या प्रितमताईंना द्या त्या 10 वर्षे त्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यानंतर ती रेल्वे आली. त्यामुळे बाप्पा भाग्यवान आहेत. पेरलं कुणी? मशागत कुणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले. पण तुम्ही या रेल्वेचा आणखी विकास कराल त्यासाठी मी तुमच्यापाठीशी उभी आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना टोला लगावला आहे.

आयुषच्या खुनासाठी मामा कृष्णानेच दिलं पिस्तूल, मोबाइल फोडला अन्… मारेकऱ्यांची कबुली

बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्गाचे आज उद्धाटन करण्यात आले. हे उद्धाटन म्हणजे बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिलीयं. या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण आर्थिक सहभाग 50 टक्के असून आजवर शासनाने तब्बल 2 हजार 91 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता नव्याने 150 कोटींची भर घालण्यात आली आहे.

 

follow us