ज्येष्ठांसाठी बातमी! रेल्वे तिकीट दरात सवलत मिळणार? रेल्वेमंत्र्यांचा संसदेत मोठा खुलासा

ज्येष्ठांसाठी बातमी! रेल्वे तिकीट दरात सवलत मिळणार? रेल्वेमंत्र्यांचा संसदेत मोठा खुलासा

Indian Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या वयस्कर मंडळींसाठी दिलासा (Indian Railway) देणारी बातमी आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) याबाबत महत्वाची माहिती देण्यात आली. रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास भाड्यात सवलत द्यावी अशी मागणी काही खासदारांनी केली. यावर बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी (Ashwini Vaishnaw) सांगितले की रेल्वेच्या स्थायी समितीने स्लीपर आणि थर्ड एसी क्लासमध्ये सवलत देण्याची शिफारस केली आहे.

मंत्री वैष्णव पुढे म्हणाले की तसं पाहिलं तर रेल्वे प्रत्येक प्रवाशाला प्रवास भाड्यात सरासरी 45 टक्के सबसिडी देतच आहे. परंतु, ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) वेगळी सवलत पूर्णतः बंद नाही. त्यामुळे ही सवलत पु्न्हा सुरू होऊ शकते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत माहिती दिली. भारतीय रेल्वे आधीपासूनच प्रवाशांना तिकीट दरात मोठी सवलत देत आहे. सन 2023-24 मध्ये रेल्वेने एकूण 60 हजार 466 कोटी रुपये सबसिडी प्रवाशांना दिली आहे. यात सरासरी काढायची म्हटलं तर प्रत्येक प्रवाशाला प्रवास भाड्यात 45 टक्के सबसिडी मिळाली आहे. वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार जर एखाद्या ठिकाणचे प्रवास भाडे 100 रुपये असेल तर प्रवासी मात्र यातील 55 रुपयेच देतात.

सोशल मीडियावर Railway Reform चा ट्रेंड का? तब्बल दहा लाखांहून अधिक पोस्टचा पाऊस !

सध्या कुणाला मिळतेय सवलत

ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त अन्य प्रवाशांनी रेल्वेच्या प्रवास भाड्यात सवलत मिळत आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्ती, गंभीर आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण आणि विद्यार्थी वर्गातील विविध उपगटांना सवलत मिळत आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली. कोरोना संकट (Corona Pandemic) सुरू होण्याच्या आधीपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात विशेष सवलत मिळत होती. पुरुष प्रवाशांना 60 वर्षे वयानंतर 40 टक्के सूट दिली जात होती. तर महिला प्रवाशांना 58 वयानंतर 50 टक्के सवलत मिळत होती. परंतु, 20 मार्च 2020 नंतर ही सवलत थांबवण्यात आली होती. यानंतर ही सवलत अजून तरी सुरू झालेली नाही.

संसदेत अनेक खासदारांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत पुन्हा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. स्लीपर आणि 3 एसी डब्यात तरी ही सवलत मिळावी अशी मागणी केली. यावर सरकारने या प्रस्तावावर विचार केला जात असून रेल्वेच्या समितीने याचा आढावा घेतला आहे असे सांगितले.

मोठी बातमी! रेल्वेने इमर्जन्सी कोटा नियमांत केला बदल; जाणून घ्या, कसे मिळेल तिकीट..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube