सोशल मीडियावर Railway Reform चा ट्रेंड का? तब्बल दहा लाखांहून अधिक पोस्टचा पाऊस !

  • Written By: Published:
सोशल मीडियावर Railway Reform चा ट्रेंड का? तब्बल दहा लाखांहून अधिक पोस्टचा पाऊस !

Railway Reform: देशात सर्वाधिक केंद्र सरकारच्या (Central Goverment) नोकऱ्या रेल्वे खात्यामध्ये आहेत. दरवर्षी तीस हजारांहून अधिक नोकरभरती होत असते. अनेकदा या नोकर भरतीवर (Railway) संशय घेतला जातो. आता भारतीय रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया सुधारण्याची मागणी होत आहे. त्यासाठी एक्सवर # Railway_Reform ही हॅशटॅग मोहिम सुरू केलीय. चर्चेतील शिक्षक खान सर आणि राकेश यादव यांनी ही हॅशटॅग मोहिम सुरू केलीय. त्यामुळे या मोहिमेला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल दहा लाखांहून अधिक पोस्ट या मोहिमेत आल्यात.

चार जुलैपासून सुरू झालेल्या मोहिमेत लाखो एक्स पोस्ट लिहिण्यात आल्यात. पहिल्या दिवशी हा हॅशटॅग काही काळासाठी एक्सवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये आला होता. विद्यार्थ्यांनी रेल्वेकडून नोकऱ्या, न्याय आणि पारदर्शकतेची मागणी केल्या आहेत. त्यात पाच मागण्या आहेत.

या पाच मागण्या

रेल्वे भरती कॅलेंडर जारी करावे.

‘गट ड’ मधील रिक्त पदांची संख्या वाढवावी

रेल्वे भरतीमध्ये प्रतीक्षा यादीत पारदर्शकता असावी

विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रे देण्यात यावीत.

भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी.


खान सरांची मोहिम; परीक्षा केंद्राबाबत तक्रारी

खान सरांनी ही मोहीम सुरू केलीय. त्यात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते म्हणतात की इतक्या वर्षांनंतरही भरतीच्या बाबतीत रेल्वेमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. त्यांच्याकडे कोणतेही नोकरी कॅलेंडर नाही. ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभरात काय होणार आहे याची कल्पना येत नाही. परीक्षा केंद्राबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी त्यांच्या घरापासून दूर पाठवले जाते, या व्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचे मत खान सरांचे आहे.


तो पॅटर्न विद्यार्थ्यांना मारक

इतर अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही सोशल मीडियावर रेल्वेकडे आपला आक्षेप नोंदवला आहे. खान सर म्हणतात, की गेल्या काही काळापासून विद्यार्थी रेल्वेवादात अडकले आहेत. एक पॅटर्न तयार झाला आहे, आधी परीक्षा द्या, नंतर निषेध करा आणि एफआयआरला सामोरे जा.


लाखो पदे रिक्त, पण भरती फक्त 32 हजारांची

रेल्वे भरती मंडळाने (RRB) जानेवारी महिन्यात ग्रुप डी भरतीसाठी रिक्त जागा जाहीर केल्या. तेव्हाही विद्यार्थ्यांनी त्यांचा आक्षेप नोंदवला होता. लाखो पदे रिक्त आहे. पण 32 हजार 438 पदांवर भरती करण्यात येणार आहे. परंतु रिक्त जागांचा विचार केल्यास एक लाख लोकांची भरती केली पाहिजे, अशी मागणी खान सरांची आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube