मोठी बातमी! रेल्वेने इमर्जन्सी कोटा नियमांत केला बदल; जाणून घ्या, कसे मिळेल तिकीट..

मोठी बातमी! रेल्वेने इमर्जन्सी कोटा नियमांत केला बदल; जाणून घ्या, कसे मिळेल तिकीट..

Indian Railways : भारतीय रेल्वेने अलीकडच्या काळात (Indian Railways) नियमांत मोठे बदल केले आहेत. आताही नियमांत एक मोठा बदल करण्यात आला आहे. इमर्जन्सी कोटाच्या तिकीट मिळण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या नियमानुसार आता प्रवाशांना रेल्वे मार्गस्थ होण्याच्या किमान एक दिवस आधी आपत्कालीन कोट्यासाठी अर्ज करावा लागेल. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) एक परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकात म्हटले आहे की रात्री बारा वाजल्यानंतर आणि दिवसातील 1 वाजण्याच्या दरम्यान रवाना होणाऱ्या सर्व रेल्वेंसाठी आपत्कालीन कोटा विनंती दुपारी 12 वाजेपर्यंत मिळायला हव्यात. दुपारी 2 ते रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान रवाना होणाऱ्या रेल्वेंसाठी आपत्कालीन कोटा विनंती आदल्या दिवशी 4 वाजेपर्यंत मिळायला हव्यात. रेल्वे मार्गस्थ होण्याच्या दिवशी कोट्यासाठी अर्ज केला तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

रेल्वे तिकीट मिळणार ईएमआयवर! रेल्वे विभागाचा मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

रविवार किंवा अन्य दिवशीच्या सु्ट्ट्यांच्या बाबतीतही या परिपत्रकात उल्लेख केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की सुट्टीच्या दिवसात धावणाऱ्या रेल्वेंसाठी आपत्कालीन कोटा मागणी अर्ज कामकाजाच्या दिवशी केले असतील तरच मान्य केले जातील. म्हणजे जर रविवार या सुट्टीच्या दिवशी कोटा हवा असेल तर त्यासाठी अर्ज आधीच्या कामकाजाच्या दिवशीच्या कार्यालयीन वेळेच्या दरम्यान मान्य केले जातील.

नव्या नियमानुसार पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी दोन वाजेदरम्यान धावणाऱ्या रेल्वेंचा पहिला चार्ट एक दिवस आधी 9 वाजेपर्यंत तयार होईल. याच पद्धतीने दुपारी 2 ते रात्री 11.59 वाजता तसेच रात्री 12 ते पहाटे 5 च्या दरम्यान रवाना होणाऱ्या रेल्वेंसाठी पहिला आरक्षण चार्ट आठ तास आधी तयार करण्यात येईल असे काही महत्वाचे बदल रेल्वेने केले आहेत.

आता रेल्वेचे तिकीट ईएमआयवर

रेल्वे विभाग (Railway Departments) प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा, म्हणून नेहमीच नवनवीन धोरणे राबवत असते. प्रवाशांच्या हिताचे निर्णय ते नेहमीच घेत असतात. त्याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर फायदाही होत असतो. याच धोरणांतर्गत रेल्वेने तिकीट रिझर्व्हेशन, वेटिंग तिकीट, रिझर्व्हेशन चार्ज, तत्काळ तिकीटच्या बुकिंगमध्ये अनेक बदल केले आहेत. आता रेल्वे विभागाने (Railway Ticket) आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. विभागाने एक स्पेशल टूर पॅकेज (Railway Ticket On EMI) आणले आहे. ज्यामध्ये हे पॅकेज घेतल्यानंतर प्रवाशांना तिकीटाचे पैसे हप्त्याने चुकवता येणार आहेत. प्रवाशांना ईएमआयद्वारे ही रक्कम भरता येईल.

रेल्वे तिकीट ते युपीआय पेमेंट; 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube