आईने जन्म दिला तर संगीताने… World Music Day निमित्त बी प्राकने व्यक्त केल्या भावना
World Music Day B Praak expressed feelings : संगीतकार-गायक बी प्राक (B Praak) चा कलाकार ते राष्ट्रीय आयकॉन हा प्रवास प्रेरणादायी आहे यात शंका नाही. जागतिक संगीत दिनानिमित्त संगीतकार-गायकाने त्यांच्यासाठी संगीताचा अर्थ काय हे उघड केलं असून त्याने असेही व्यक्त केले की, त्याच्या संपूर्ण प्रवासात त्याचा आईचा खास पाठिंबा कसा होता हे सांगितलं !
Rockstar DSP देणार चाहत्यांना सरप्राईज, केली मोठी घोषणा
“जर माझा स्टुडिओ माझे मंदिर असेल, तर संगीत माझा देव आहे. जर माझ्या आईने मला जन्म दिला, तर संगीताने मला जिवंत ठेवले. माझ्यासाठी संगीत हा जिव्हाळ्याचा विषय आहे. गाण्यातून मनोरंजन करून जगभर आनंद पसरवण्याचा उद्देश आहे आणि मी खूप आभारी आहे. माझ्या चाहत्यांना मला कायम प्रेम दिल यात. माझ्यावर देवी सरस्वतीचा आशीर्वाद नसता मी जे आहे ते बनलो नसतो असं बी प्राक सांगतो.
World Music Day निमित्त आयुष्मान खुरानाने दाखवली ‘रह जा’ गाण्याची झलक!
बी प्राकने भारतीय संगीत उद्योगात एक अद्वितीय स्थान निर्माण केलं आहे.‘मन भर्या’ ते ‘तेरी माती’ ते ‘बडा पाचोगे’ आणि इतर अनेक पॉवर परफॉर्मर चार्टवर राज्य करण्यास सक्षम आहे.गेल्या काही वर्षांमध्ये, त्याच्या चाहत्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे, ज्यामुळे तो एक अष्टपैलू भारतीय गायक म्हणून स्थापित झाला आहे. सध्या, कामाच्या आघाडीवर, त्याच्या किटीमध्ये काही मनोरंजक प्रकल्प आहेत, ज्यांची लवकरच घोषणा केली जाईल.