‘कांगुवा’ मधील रॉकस्टार डीएसपीचा ‘फायर’ गाणे संपूर्ण भारतातील यूट्यूब चार्टमध्ये ठरला अव्वल

‘कांगुवा’ मधील रॉकस्टार डीएसपीचा ‘फायर’ गाणे संपूर्ण भारतातील यूट्यूब चार्टमध्ये ठरला अव्वल

Rockstar DSP & B Praak Fire Song : देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी (Rockstar DSP) आणि बीप्राक (B Praak) यांच्या ‘कांगुवा’साठी (Kanguva Movie) अलीकडच्या सहकार्याने संगीतप्रेमी ना खुश केलं आहे. ‘फायर’ नावाचे गाणे ( Fire Song) जे एक दिवसापूर्वी रिलीज झाले होते, ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार तसेच संपूर्ण भारतीय अष्टपैलू गायक यांचे पराक्रम सिद्ध करून देशभरातील यूट्यूब ( YouTube) चार्टवर अव्वल स्थानावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Studio Green (@studiogreen_official)


डीएसपी आणि बी प्राक यांनी देशाला त्यांच्या सुरात गुंफण्याची ख्याती आहे आणि ‘कांगुवा’ ट्रॅक त्यांच्या डिस्कोग्राफीमध्ये आणखी एक भर आहे. हे गाणे रिलीज होताच ते सर्वत्र ‘व्हायरल’ झाले होते आणि आता ते वर्षातील चार्टबस्टर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

याआधी दोन संगीतकारांनी ‘सरिलेरू नीकेव्वरु’ मधील ‘सुर्युदिवो चंद्रुदिवो’ गाण्यासाठी सहकार्य केले होते, जे त्या वर्षी चार्टबस्टर्सपैकी एक म्हणून उदयास आले होते. ट्रॅक ही चित्रपटाची फक्त एक झलक आहे, तर प्रेक्षक पूर्ण अल्बम बाहेर येण्याची वाट बघत आहेत. ‘कांगुवा’ च्या पलीकडे, रॉकस्टार डीएसपीकडे यावर्षी त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक प्रकल्प आहेत. ‘पुष्पा 2: द रुल’ मधील अलीकडे रिलीज झालेल्या व्हायरल ट्रॅकने तो आधीच कहर करत आहे.

Rockstar DSP ने करावा भारत दौरा; चाहत्यांनी व्यक्त केली इच्छा!

याशिवाय त्याच्या लाइनअपमध्ये पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंग’, अजितचा ‘गुड बॅड अग्ली’, नागा चैतन्यचा ‘थंडेल’ आणि धनुषचा ‘कुबेरा’ यांचा समावेश आहे. ऑक्टोबरपासून संगीतकार त्याच्या भारत दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. दरम्यान, बी प्राक आंतरराष्ट्रीय स्तरावर विकल्या गेलेल्या मैफिलींमध्ये सादर करत आहे आणि लवकरच आणखी काही प्रकल्पांची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube